अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२७/११/१९ :
आज दिनांक २७/११/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक,मेन बाजार, भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते गेलॉर्ड चौक ते जयहिंद चौक, पिंपरी गाव, रहाटणी ते नखाते वस्ती,रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६ नग
२) लोखंडी बाकडे २ नग
३) लोखंडी पाणीपुरी स्टॅण्ड २ नग
४) प्लास्टिक पाण्याचे जार ३ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.