ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/११/१९ :
आज दि. २०/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात दुसऱ्या सत्रात जुनी सांगवी आनंद नगर परिसरात अतिक्रमण कारवाई करुन विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ११
२. प्लास्टीक क्रेट १२
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करणेत आली असुन कारवाई कामी ३ बिट निरीक्षक व १० होमगार्ड हजर होते