अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १३/११/१९ :
आज दिनांक १३/११/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील भेळ चौक निगडी, हुतात्मा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन पोलीस चौकी चौक, संभाजी चौक, म्हाळसाकांत चौक येथील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स काढणेत आलेले आहेत.तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थेरगाव फाटा ते थेरगाव गावठाण व राघवेंद्र स्वामी मठ ते थेरगाव रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ७
२) चार चाकी टेम्पो २
३) फ्लेक्स बॅनर्स १३
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस पथक हजर होते.