क व इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/११/१९ :
आज दिनांक 2/11/2019 रोजी सकाळी सत्र मध्ये रसरंग चौक ते झीरो बॉयीस चौक दरम्यानच्या 15 हातगाडय़ा 5 टपऱ्या 8 स्टॉल, 50 झोपड्या चा सर्वे करून अनधिकृत हातगाडय़ा टपरी स्वतः काढून घेण्याबाबत तसेच न काढल्यास कठोर कारवाई सामोरे जावे लागेल याबाबत सविस्तर माहिती दिली व समज रजिस्टर वर सही घेऊन समज दिली.
दुपारी सत्र मध्ये अजमेरा, Masulkar colony, वास्तु उद्योग, झीरो बॉयीस चौक, यशवंत नगर, इंद्रायणी कॉर्नर, इंद्रायणी स्वीट कॉनर, बॅडमिंटन हॉल, तिरुपती बालाजी चौक, इंद्रायणी मीनी मार्केट इत्यादी ठिकाणी चे 19 बॅनर्स, 13 फ्लेक्स, 18 जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत हातगाडय़ा पथरी वाला याना हटवून पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले.
1. लोखंडी वजन काटे 11
2. लोखंडी फलक 2
3. प्लास्टिक क्रेट 14
4. प्लास्टिक स्टूल 2
5. प्लाइवुड 1
6. लोखंडी स्टँड 1
7. मोठया छत्र्या 2
उपरोक्त साहित्य जप्त करून मनपाचे नेहरू नगर येथील गोडाऊन मधे जमा केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी होमगार्ड यांचे मार्फत करण्यात आली आहे.