अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ६/११/१९ :
आज दिनांक ६/११/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड आकुर्डी निगडी प्राधिकरण येथे व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते गेलॉर्ड चौक, काळेवाडी रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६
२) लोखंडी काऊंटर १
३) लोखंडी जाळी ४
४) जाहिरात बोर्ड ६
५) फ्लेक्स बॅनर्स ८
तसेच रहाटणी फाटा येथील अनधिकृत १४ हातगाड्या,९ पथारीधारक यांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते.