अ व ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ११/९/१९ :
आज दिनांक ११/९/१९ रोजी अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक, कराची चौक,साई चौक,गेलॉर्ड चौक, जयहिंद शाळा चौक, पिंपरी गाव परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या २
२) जाहिरात बोर्ड ५
३) लोखंडी स्टॅण्ड २
४) लोखंडी जाळी १
तसेच काळेवाडी ते काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी रोडवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १८ हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.