अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ३/९/१९ :
आज दिनांक ३/९/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील मोरवाडी चौक ते पिंपळे पेट्रोल पंपापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक ते १६ नं. बसस्टॉप थेरगाव, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६
२) जाहिरात बोर्ड ५
३) लोखंडी स्टॅण्ड २
४) मोठी कापडी छत्री २
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे