क,इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २७/८/१९ :
🖕आज दिनांक 27/8/2019 रोजी *सकाळी :- प्राप्त तक्रारी नुसार सेक्टर 22, ओटा स्कीम, यमुना नगर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ virology ,दुर्गा चौक निगडी इत्यादि ठिकाणी च्या 19 टपरी वाल्यांना समज रजिस्टर वर सही घेऊन समज दिली. 24 तासात टपरी इतरत्र न हलवल्यास कठोर कारवाई सामोरे जावे लागेल याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष 2 टपरी धारकांना स्वतः होऊन अतिक्रमण काढून टपरी काढून घेण्यास भाग पाडले माता अंजली मठ रस्ता वरिल हातगाडय़ा पथरी वाले हटवले 2 वजन काटे जप्त केले
दुपारी :- दिघी बोपखेल गाव बाजार इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून दोन्ही मिळून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले. दिघी बोपखेल रस्ता अतिक्रमण मुक्त केला
1) प्लास्टिक क्रेट 18 नग
2) मोठी छत्री 1 नग
3) लोखंडी काटे. 4 नग
हटवले :-
4) हातगाडय़ा 13 नग
5)पथरी वाले. 15 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी व होमगार्ड याचे मार्फत केली असे