पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-सप्टेंबर २०१७
 

पिंपरी चिंचवड फेस्टिवल

   

पिंपरी चिंचवड फेस्टिवलचे स्वरुप छोटे असले तरी चालेल मात्र फेस्टिवल मध्येच बंद पडता कामा नये, याबाबत दक्षता घ्यावी. अशा फेस्टिवल मुळेच सर्वजन एकत्र येऊन काम करतात. अशा फेस्टिवलचे आयोजन सातत्याने करायला हवे, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड फेस्टिव्हलचे उद्घाटन आज त्याच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

सुप्रसिध्द सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवामुळे सांस्कृतिक आणि वैचारीक देवाण घेवाण होते. पिंपरी चिंचवडचा रसिक निश्चितच चांगला आहे. निष्ठा असेल तर लवकरच ध्येयपुर्ती होते. पर्यावरणाशी आपण मैत्री करायला हवी. गणपतीच्या आरासासाठी पुस्तकाचे घर मी केले होते. माझ्या मुलीला मी निसर्गाशी मैत्री करायला शिकविले आहे. समाज समुहाला पुढे नेण्यासाठी कार्य करायला हवे. तसेच सर्वांनी निसर्गाशी मैत्री करुन पर्यावणाचा समतोल राखावा. कोणत्याही गोष्टीला वेळ काढल्याशिवाय ध्येयपुर्ती होत नाही. धर्मभेद विसरुन एकमेकांच्या सहकार्याने समाज नावाच्या विश्वाला पुढे न्यावे असे आवाहन सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी केले.

 
 
 
 

पिंपरी चिंचवड फेस्टिवल

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सास्कृतिक, कला  धोरनांतर्गत पिंपरी चिंचवड फेस्टिवल - २०१७ चे आयोजन करणेत आले असून दि. १ ते ३ सप्टेंबर दरम्यान विविध मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत

आज दि. २ सप्टेंबर २०१७ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात दुपारी १२.०० वाजता कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनेने झाली. प्रसिध्द नृत्यकार फिरोज मुजावर यांनी नृत्य अविष्काराचे सादरीकरण केले.

यावेळी सह. शहर‍ अभियंता प्रविण तुपे, कार्यकारी अभियंता तथा मुख्य संयोजक प्रशांत पाटील, सहा. अभियंता किरण अंधुरे, चंद्रकांत कुंभार, माहीती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय घावटे, संतोष जाधव व मुख्य लिपिक संतोष कोराड आदी मान्यवर उपस्थित हेाते.

दुपारी १२.१५ वाजता कश्मिरी पंडीतांच्या समस्येवर मकबुल या नाटकाचे सादरीकरण झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता प्रथम तुला वंदितो या सदराखाली मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गीताला भरभरुन दाद  दिली .
 
 
 
 

पिंपरी चिंचवड फेस्टिवल

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक, कला  धोरनांतर्गत पिंपरी संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवार दि. २ सप्टेंबर २०१७ रोजी व्दितीय सत्रात विविध मनोरंजनात्मक व प्रबोधणात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी ५.३० वा. लेखक व दिग्दर्शक संतोष पवार प्रस्तुत यंदा कदाचित हे महिलांचे समस्या मांडणारे विनोदी नाटक सादर करण्यात आले. या नाटकाव्दारे महिलांच्या विविध समस्यांवर प्रभावीपणे प्रकाश टाकुन प्रबोधन करण्यात आले. या नाटकास प्रक्षकांनी भरभरुन दाद दिली.

त्यानंतर रात्री ९ वाजता कपूर घराण्यातील सर्व कलाकारांवर आधारित दृकश्राव्य पध्दतीने द कपूर्स डायरी हा भावना प्रधान गीत नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. सिनेसृष्टीमध्ये ११० वर्षाची परंपरा असलेले कपूर घराण्यातील पृथ्वीराज कपूर पासून आजच्या रणबीर कपूर पर्यंत सर्व सिने कलाकारांचे संबंधित नृत्य व गीते सादर करण्यात आली. यावेळी रणबीर कपूर, ऋषी कपूर, करीना कपूर व करीष्मा कपूर यांच्यावर आधारित गीत नृत्यांचा ही कार्यक्रम सादर करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला

 
 
 
 

स्वच्छता विषयक उत्कृष्ठ काम

   

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा नेहमी मोलाचा सहभाग असतो असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, पिंपरी येथे स्वच्छता विषयक उत्कृष्ठ काम करणारे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार यांचासन्मान त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते स्वच्छते विषयक काम करणारे५५ महापालिका अधिकारी व कर्मचारी, २ स्वयंसेवी संस्था, ९ सामाजिक कार्यकर्ते यांचास्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला

 
 
अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेले सफाई कर्मचारी पाल्य योगेश चावरे, मधु चावरिया यांचाही यावेळी महापौर नितीन काळजे व ॲड सागर चरण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
 
 

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

   

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या गणेश मंडळाचे स्वागत महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकरयांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश विसर्जनासाठी  चिंचवड गांव येथील चापेकर चौकात आणि पिंपरी येथील कराची चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे तसेच ढोललेझीम पथकांच्या प्रमुखांचे पुष्पहार व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी चापेकर चौक, चिंचवड गांव येथे आमदार लक्ष्मन जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माधुरी कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेंडगे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक  गणेश लोंढे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे क्षेत्रियअधिकारी संदिप खोत, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, व जनसंपर्कचे रमेश भोसले आदींनी मंडळांचे स्वागत केले

 
 
 
 

आधार कार्ड नोंदणी अभियान

   

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात रविवार दि. १० सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६.०० वाजे पर्यंत विशेष आधार कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

आज या अंतर्गत महापालिकेच्या ८ ही क्षेत्रीय का र्यालयामध्ये विशेष अभियान राबविण्यात आले असून त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

या अभियानामध्ये नविन आधार कार्डची नोंदणी व या पूर्वी काढलेल्या आधार कार्ड मधील दुरुस्ती करण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत क्षेत्रिय कार्यालयनिहाय आधार मशिन किट ऑपरेटरसह उपलब्ध करुन दिल्या आहेत.

 
 
नविन आधार कार्ड नोंदणीसाठी  कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतू यापूर्वी काढणेत आलेल्या आधार कार्डमध्ये दुरुस्तीसाठी र.रु.२५/- शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आकारणेत येईल. यांची नोंद घ्यावी.
 
 

राष्ट्रीय अभियंता दिन

   

शहराच्या विकासामध्ये अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे. चांगले नियोजन केल्यास शहराचा सर्वांगीन विकास होण्यास मदत होईल. याकामी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन चांगल्याप्रकारचे काम उभारावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

सोमवार दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अभियंता दिन नटसम्राट निळू फुले रंगमंदीर, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, ज्यांनी हे रंगमंदिर उभारण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण हे रंगमंदिर पाहिल्यानंतर परिपूर्ण सेवा सुविधांनी उपयुक्त असे कलादालनच वाटत आहे. रंगमंदिराचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. अशाच प्रकारे महानगरपालिकेकडून इतरही कामकाजाचे चांगले नियोजन झाल्यास शहराला भेडसावत असणा-या पाण्याच्या व कच-याच्या समस्या देखील सुटण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

 
 
यावेळी प्रमुख पाहूणे लेखक व दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विवेक घळसासी, प्रमुख वक्त्या सुलक्षणा महाजन व कनिष्ठ अभियंता राजेश जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
 
 

अँटोमॅटीक टॉयलेटच्या उदघाटन

   

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात निगडी बस स्टॉप येथे  प्रथमच अँटोमॅटीक टॉयलेट बसविण्यात येत आहे. मे. सॅमटेक क्लिन अँड केअर प्रा.लि कंपनी स्वखर्चाने  Demo Premium Toilet बसविणार आहे. सदर जागेवर जाहिरात व Coin Collection च्या माध्यमातून टॉयलेटचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च पुढील ७ वर्षे कंपनीकडून भागविला जाणार आहे. त्या करिता जागा, पाणी, वीज व सांडपाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबतचे धोरण महानगरपालिकेने मंजूर केले आहे. सदर अटोमॅटीक टॉयलेट संपूर्णत: स्टेनलेस स्टील चे असून त्यामध्ये वॉश बेसिन, ऍल्युमिनियम फ्लोरींग, ऍटो क्लींनिंग आणि टॉयलेट सिट, इनबिल्ट वॉटर टँक, सेन्सर फॉर इलेक्ट्रीसिटी कन्झरवेशन, जीपीआरएस लोकेशन/हेल्थ मॉनिटरींग, महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन मशीन अशा सुविधा या टॉयलेटमध्ये उपलब्ध असतील.

 

 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in