पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-सप्टेंबर २०१६
 

गणेश विसर्जन सोहळा

   

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या गणेश मंडळाचे स्वागत महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश विसर्जनासाठी  चिंचवड गांव येथील चापेकर चौकात आणि पिंपरी येथील कराची चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे तसेच ढोललेझीम पथकांच्या प्रमुखांचे पुष्पहार व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.

 

 
 
पिंपरी व चिंचवड येथील घाटावर विसर्जन हौद, निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कुंड, अग्निशमन वाहन, फिरत्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. घाटावर अग्निशमन दलाचे जवान तसेच जिवरक्षक, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रथमोपचार केंद्र व वैद्यकिय पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. घाटांच्या परीसराची स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 
 

राजमाता जिजाऊ उद्याना टप्पा क्र. २

   

– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामधील टप्पा क्र. २ च्या नुतनीकरण कामाचे भूमीपुजन समारंभ व सांगवी पोलिस स्टेशन येथे बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेराचे उदघाटन बुधवार दि. ०७ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११.०० वा. होणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, अमर साबळे तसेच आमदार लक्ष्मण जगताप, ॲड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई कदम, विरोधी पक्षनेते राहूल भोसले, आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, तसेच विधी समिती सभापती नंदा ताकवणे,

 
 
शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने, महिला व बाल कल्याण समिती सभापती गीता मंचरकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, शिक्षण मंडळ सभापती चेतन भुजबळ, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढरकर, ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे, ड प्रभाग अध्यक्ष अरूण टाक, इ प्रभाग अध्यक्षा श्रध्दा लांडे, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, शिवसेना व आर.पी.आय. महायुती (आघाडी) च्या गटनेत्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, मनसे गटनेते अनंत को-हाळे, भाजप गटनेत्या वर्षा मडिगेरी, माजी महापौर आर.एस.कुमार, योगेश बहल, अपर्णा डोके, मोहिनी लांडे, नगरसदस्य रामदास बोकड, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, नगरसदस्या वैशाली जवळकर, सह आयुक्त दिलीप गावडे आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत
 
 

जर्मनीतील शिष्टमंडळाची भेट

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांना जर्मनीतील फ्रँकफर्ट अप्लाईड सायन्स युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्र शाखेच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या शिष्टमंडळाने आज भेट दिली.

या शिष्टमंडळाचे स्वागत महापौर शकुंतला धराडे यांनी केले, स्थायी समिती सभापती डब्बू असावानी व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.

या अभ्यास दौ-यामध्ये कॅरोलिन कॅटझर, जुलियाना हिंटस, फ्रासिस्का कोस्टर, रिआ इस्कलाईन, कुब्रा हाझनेआ, इलेना रुडॉल, टोबीआस लिबींग, इम्यानुयेल राऊबर, फेलीक्स नेऊ यांचा समावेश होता.

 
 
अभ्यास दौरा पथकाने महिला बचतगटास तसेच सारथी प्रकल्पास भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची चित्रफित दाखविण्यात याली. अभ्यासदौ-याचे समन्वयक म्हणून जर्मनीचे फिलीप म्युलर तसेच प्रविण भालेसईन यांनी काम पाहिले
 
 

विशेष मतदार नोंदणी मोहिम

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वञिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून मतदानापासून पाञ मतदार वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. १५ सप्टेबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान विशेष मतदार नोंदणी मोहिम राबवली जाणार असून दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणा-यांनी या अंतर्गत नाव नोंदणी करावी असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.

दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणा-यांना तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा पाञ मतदारांना मतदार म्हणून नावे नोंदविण्याची संधी उपलब्ध असणार आहे. यावेळी पत्त्यातील दुरूस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे

 
 
२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील मतदार नोंदणीसाठी थेरगाव येथील मनपा शाळा येथे तर २०६-पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील मतदार नोंदणीसाठी आकुर्डी स्टेशनजवळील डॉ. हेगडेवार भवनात तसेच २०७-भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील मतदार नोंदणीसाठी नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे तर २०३-भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेञातील मतदार नोंदणीसाठी भोर येथील प्रांत कार्यालयात मतदार नोंदणीसाठी संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
 
 

विशेष स्वच्छता मोहिम

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष स्वच्छता मोहिमे अंतर्गत क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे यांनी सहभाग घेवून आपला परिसर नागरिकांनी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक नवनाथ जगताप, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक दिलीप मानमोडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 
 
संत तुकारामनगर, यशवंतराव चव्हाण रुग्णालय परिसरातही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, सलीम इनामदार परिसरातील नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मोहिमे दरम्यान सुमारे १.३ टन कचरा उचलण्यात आला.
 
 

दिघी-बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालयाचे उदघाटन

   

दिघी बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालयामुळे दिघी व बोपखेल येथील रहिवाशांना मिळकत कर भरण्यासाठी तसेच कर आकारणीच्या कामासाठी सुविधा उपलब्ध झाली असून परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महेशदादा लांडगे यांनी केले.

दिघी गावठाण, महापालिकेच्या शाळेजवळ नव्याने सुरु करण्यात आलेल्या दिघी-बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालयाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 
 
यावेळी आमदार महेशदादा लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अडीअडचणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नेहमी सोडवित असतो. अडचणी लक्षात घेऊन त्या पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. दिघी बोपखेल येथील सुमारे १५ हजार मिळकतधारकांना मिळकतकर भरण्यासाठी करावी लागणारी ४-५ किलोमीटरची पायपीट या कार्यालयामुळे थांबणार असून महापालिकेचा मिळकतकर भरणाही यामुळे वाढेल. पाणीपट्टी बिल भरण्याची सुविधाही लवकरात लवकर याठिकाणी केली जाईल. तसेच या भागात जास्त प्रमाणात पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
 
 

राष्ट्रीय अभियंता दिन

   

शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या उभारणी मध्ये महापालिकेच्या अभियंत्यांचेहि महत्वपूर्ण योगदान असून त्यांच्या कार्यामुळे शहराच्या नाव लौंकीकात भर पडली असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा. ज्यु. इंजिनिअर्स असोशिएशन व मनपा अभियंते यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्र्वेश्र्वरैया यांची जयंती आणि राष्ट्रीय अभियंता दिन या निमित्त आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर, पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते.

 
 
यावेळी माजी महापौर योगेश बहल, महासंघ प्रतिनिधी भगवान मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मेंगशेट्टी यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी व किरण अंदुरे यांनी केले. आभार सुनिल बेळगांवकर यांनी मानले.
 
 

मतदार नोंदणी जनजागृती

   

लोकशाही सक्षमीकरणामध्ये युवकांचे योगदान महत्वाचे असून, युवकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणुक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी जनजागृती व्हावी यासाठी ताथवडे येथील इंदिरा आर्टस, सायन्स अण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीच्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

.
 
 
शहरातील १४ महाविद्यालयातदेखील मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये सांगवी येथील बाबुराव घोलप विद्यालय, पिंपरी येथील मानधनमल उधराम कॉलेज, चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, पिंपरी येथील डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठाण इ अँन्ड टीसी, निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी, निगडी प्राधिकरण येथील डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठाण कला,वाणिज्य आणि विज्ञान, आकुर्डी येथील डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, चिंचवड स्टेशन येथील एटीएसएस कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचवड येथील रसिकलाल एम, धारिवाल इन्स्टिटयूड, ताथवडे येथील राजश्री शाहू कॉलेज, रावेत रोड ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, वाकड येथील इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांचा समावेश आहे.
 
Social Message by pcmc
 

१ जानेवारी २०१७ रोजी पर्यंत जर आपल्या वयाची १८ वर्ष पूर्ण होत असतील तर मतदान यादीत आपले नाव नोंदवा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in