पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-सप्टेंबर २०१५
 

सांगवी ते किवळे बी.आर.टी.एस. मार्गाचे उद्घाटन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या सांगवी ते किवळे बी.आर.टी.एस. मार्गाचे उद्घाटन ५ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे तसेच आमदार लक्ष्मण जगताप, ॲड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई कदम, आयुक्त राजीव जाधव, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, ब प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे, क प्रभाग अध्यक्ष किरण मोटे, ड प्रभाग अध्यक्ष अरूण टाक,

 
 
इ प्रभाग अध्यक्षा विनया तापकिर, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बो-हाडे, शिवसेना व आर.पी.आय. महायुती (आघाडी) च्या गटनेत्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, मनसे गटनेते अनंत को-हाळे, भाजप गटनेत्या वर्षा मडिगेरी, माजी महापौर आर.एस.कुमार, योगेश बहल, अपर्णा डोके, मोहिनी लांडे, नगरसदस्या सुमन नेटके, संगीता भोंडवे, अनिता तापकीर, विमल जगताप, झामाबाई बारणे, माया बारणे, यमुना पवार, आरती चोंधे, शैलजा शितोळे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, डॉ. श्रध्दा लांडे, अश्विनी मराठे (चिखले), नीता पाडाळे, मनिषा पवार नगरसदस्य प्रसाद शेट्टी, बाळासाहेब तरस, मोरेश्वर भोंडवे, कैलास थोपटे, संपत पवार, निलेश बारणे, शेखर ओव्हाळ, विलास नांदगुडे, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, मंगेश खांडेकर, ॲड. नितीन लांडगे, सह आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 

श्री. वेंकया नायडू यांची दिल्ली येथे भेट

   

पिंपरी चिंचवड शहराचे नाव स्मार्ट सिटी या केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभागी करून घेणे बाबत शहरातील शिष्ठमंडळ माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब व माजी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. केंद्रीय मंत्री श्री. वेंकया नायडू यांची दिल्ली येथे भेट घेतली

 

 
 
 
 

दिवंगत नगरसदस्य अविनाश टेकवडे यांच्या प्रतिमेस अभिवादन

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत नगरसदस्य अविनाश टेकवडे यांच्या प्रतिमेस महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसदस्य अविनाश टेकवडे यांचे काल दु:खद निधन झाले असल्याने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 
 
यावेळी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसदस्या सुजाता पालांडे, मनसेचे गटनेते अनंत को-हाळे, सह आयुक्त दिलीप गावडे यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, शहर अभियंता एम.टी. कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कायदा सल्लागार ऍड. सतीश पवार, विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचा-यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.
महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता महापालिका कार्यालयाला महापौर शकुंतला धराडे यांनी ४ सप्टेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी जाहिर केली.
 
 

विद्यार्थी सत्कार

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण १८ माध्य्मिक विद्यालयातील इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख रक्क्म देवून सत्कार समारंभाचा उपक्रम महापालिका सन २००८-२००९ पासून राबवत आहे.
सन २०१४ - २०१५ मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १,००,०००/- रुपये तर ८५% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,०००/- रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले.


 
 
तसेच सन २०१४ पासून अंध अपंग विद्यार्थ्यांना एकूण ६,५०,०००/- एवढी रक्कम प्रोत्साहनपर देणेत आलेली आहे. सन २०१५ मध्ये इयत्ता १० वीचा ९१.३२% निकाल लागलेला आहे. उत्तीर्ण झालेल्यांपैकी १२४ विद्यार्थ्यांनी ८०% च्या पुढे गुण मिळविलेले आहेत. तसेच अंध अपंग १० विद्यार्थी असे एकूण १३४ विद्यार्थ्यांना एकूण ५६,५०,०००/- एवढी रक्कम बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
 
 

गणेशोत्सव मंडळ गौरव कार्यक्रम

   
महापालिका परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळे विविध विषयांवर उल्लेखनिय, प्रशंसनिय देखावे सादर करतात. अशा देखाव्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन कार्यकर्ते व कलाकारांचा गौरव करण्यात येतो. अशी स्पर्धा गेल्या २० वर्षांपासून सुरु करण्यात आली आहे.
सन २०१४ मध्ये धार्मिक देखावे, जीवंत देखावे व सामाजिक देखावे या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी महापालिकेकडून प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा तसेच उत्तेजनार्थ क्रमांकासाठी एकूण र.रु.२,२८,०००/- रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ७८ गणेश मंडळांनी भाग घेतला होता.

 
 
धार्मिक देखाव्यांमध्ये श्री. तुळजाभवानी मित्र मंडळ, आकुर्डी यांचा प्रथम क्रमांक आला असून यामध्ये एकूण १४ गणेश मंडळांना एकूण र.रु. ७६,०००/- तसेच जीवंत देखाव्यांमध्ये राष्ट्रतेज तरुण मंडळ, चिंचवड यांचा प्रथम क्रमांक आला असून यामध्ये एकूण १३ गणेश मंडळांना एकूण र.रु. ७८,५००/- तर सामाजिक देखाव्यांमध्ये श्रीकृष्ण क्रांती मंडळ, आकुर्डी यांचा प्रथम क्रमांक आला असून यामध्ये एकूण १० गणेश मंडळांना एकूण र.रु. ७३,५००/- रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
 
 

श्री मोरया गोसावी भाद्रपद यात्रा

   
भाद्रपद यात्रेनिमित्त श्री मोरया गोसावी मंदिरापासून मोरगावकडे प्रस्थान झालेल्या श्री मंगलमुर्तीच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर अपर्णा डोके, ब प्रभाग अध्यक्ष संदिप चिंचवडे यांनी श्री मंगलमुर्तीस पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.
चिंचवडगांव येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमास, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, भारती फरांदे, माजी नगरसदस्य राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, गजानन चिंचवडे, स्विकृत सदस्य शरद लुनावत, चिंचवड देवस्थानचे प्रमुख सुरेंद्र देव महाराज, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, लेखाधिकारी मिनानाथ इनामदार, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते
.


 
 
 
 

राष्ट्रीय अभियंता दिन

   
शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या उभारणी मध्ये महापालिकेच्या अभियंत्यांचेहि महत्वपूर्ण योगदान असून त्यांच्या कार्यामुळे शहराच्या नाव लौंकीकात भर पडली असल्याचे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड मनपा. ज्यु. इंजिनिअर्स असोशिएशन व मनपा अभियंते यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्र्वेश्र्वरैया यांची जयंती आणि राष्ट्रीय अभियंता दिन या निमित्त आचार्य अत्रे रंगमंदिर संततुकारामनगर, पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी छायाचित्रकार दिनेश फाटक, संदेश खडतरे, चंद्रकांत मुठाळ तसेच चित्रकार सुधाकर कुदळे, केशव फुटाणे आणि रांगोळीकार समिर पटेल यांचा महापौर शकुंतलाताई धराडे व सभापती अतुल शितोळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्र्वेश्र्वरैया यांची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
.

 
 
 
 

शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी करणा-या गुणवंतांचा सत्कार

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी करणा-या गुणवंतांचा सत्कार महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे व स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महापौर शकुंतला धराडे यांनी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो. अशा पुरस्काराने सन्मानित केलेल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांची इच्छा शक्ती व दृढ विश्वास वाढतो असेही त्या म्हणाल्या
.


 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in