पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-ऑक्टोबर २०१७
 

पिंपरी चिंचवड मनापा वर्धापणदिन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिना निमित्ताने विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच औद्योगिक क्षेत्रातील गौरविलेल्या उद्योजकांचा आणि गुणवंत कामगारांचा तसेच महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार बुधवार दि. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे दुपारी १२.०० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३.०० वाजता महापालिका कर्मचारी, अधिकारी व पदाधिका-यांचा गीत संगीत हा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता यशस्वी उद्योजक, गुणवंत कामगार व मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. चला हवा येऊ दया फेम श्रेया बुगडे व कुशल बद्रिके यांच्या कार्यक्रमाने वर्धापन दिनाची सांगता होणार असून नागरिकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे

 
 
 
 

पिंपरी चिंचवड मनापा वर्धापणदिन

   

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्ष अघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य नामदेव ढाके, नगरसदस्या आशा शेडगे-धायगुडे, माधुरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

   त्यानंतर महिलांसाठी आयोजित खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या विजेत्या जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे यांना पैठणी देऊन उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले

 

 

 
 
 
 

नटसम्राट निळू फुले कला महोत्सव

   

कलाकाराच्या वयावरुन नव्हे तर त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर त्याचे अनुमान मोजले जाते. असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या नटसम्राट निळू फुले कला महोत्सवच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, आदर्श शहराच्या व्याख्येत येणा-या सर्व सेवा सुविधा आपल्या परिसरात असाव्यात ही धारणा होती. नटसम्राट निळू फुले नाटयगृह परिसरात साकारण्याचे स्वप्न नागरिकांच्या पाठिंब्यामुळे मी साकारु शकलो. शहराची जडणघडण होत असताना प्रतिष्ठीत व्यक्तींचे रेखाचित्रण घडते. चित्रपटातील व वैयक्तीक जीवनातील भुमिका वेगवेगळी असते. समाज उपयोगी उपक्रम राबविण्याकामी या कलाकारांचा उपयोग झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसर हा या कलाकारांच्या पदस्पर्शाने पवित्र करावा ही भुमिका होती ती आज पूर्ण झाली असल्याने समाधान आहे

 
 
 
 

स्वीडनचे कॉन्सील जनरल

   

स्वीडनचे कॉन्सील जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांचे व त्यांचे सोबत आलेल्या शिष्टमंडळाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावऴे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, यांनी स्वागत केले

आय़ुक्त कक्षात झालेल्या बैठकीस ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडवीक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळास स्मार्ट सिटी व स्विडीश सी.एस.आर. साठी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. नजीकचे काळात सॅडविक एशिया, एस.के.एफ इ. स्विडीश कंपन्या व स्विडन सरकार यांच्या समावेत सहकार्य, तंत्रज्ञान इ.बाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.

 
 
 
 

नटसम्राट निळू फुले कला महोत्सव

   

- पिंपरी-चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि निळू फुले कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिर येथे नटसम्राट निळू फुले कला महोत्सवाच्या दुस-या दिवशी 'आठवणी निळूभाऊंच्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात निळू फुले यांच्या सोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या विविध आठवणी जाग्या केल्या.

कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, चेतन दळवी, ज्योती सुभाष, शांता तांबे, विलास रकटे, सिंधू काटे, लीला पवार, वसंत इंगळे, राजेंद्र राजापुरे, निळू फुलेंचे बंधू अशोक फुले यांनी सहभाग घेतला. या सर्व कलाकारांनी अष्टपैलू निळूभाऊ उलगडून सांगितले. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रवीण तुपे उपस्थित होते.

भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, निळू फुलेंचा ध्यास, श्वास आणि विश्वास हा अभिनय होता. त्यांनी आकाशाला गवसणी घातली तरी देखील ते मातीला कधी विसरले नाहीत. कोल्हापूर शहरातील निळू फुलेंचा पहिला मित्र मी होतो असे म्हणत भालचंद्र कुलकर्णी यांनी जगदीश खेबुडकरांनी एक शिक्षक एक विदूषकसाठी लिहिलेला मुक्तछंद सादर केला.

 

 
 

आठवणी निळूभाऊंच्या या कार्यक्रमात निळू भाऊंचे वाचनप्रेम सर्वांनी उजागरीत केले. त्यांनी आपल्या अगाध वाचनातून माणसे ओळखली. इस्लामपूरमध्ये एका नाटकाच्या प्रयोगावेळी झालेला प्रेक्षकांचा दंगा पन्नास पोलिसांना आवरता आला नाही, तो दंगा निळू फुले यांनी केवळ एका शब्दात शांत केला. आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यात त्यांनी यशस्वी पाणी चळवळ सुरू केली. कोणत्याही चित्रपटात काम केल्यानंतर पैशांसाठी कधीही त्यांनी तगादा लावला नाही, अशी आठवण वसंत इंगळे यांनी सांगितली. कुठल्याही स्तरात फिट होणारा माणूस म्हणजे निळू फुले. सहकलाकारांसाठी तळमळ वाटणारा माणूस. समाजासाठी समर्पणभाव त्यांच्याकडे होता. 'मी'पणा त्यांनी कधीच दाखविला नाही, अशा आठवणी अभिनेता चेतन दळवी यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी यांनी केले. कार्यक्रमानंतर नेरुळ, कुडाळ येथील श्री देव कालेश्वर दशावतार नाट्यमंडळाने दशावतार नाटक सादर केले. संपूर्ण दिवसभर प्रेक्षक नाट्यगृहात खिळून राहिला.

 
 

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम जयंती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     मनपा भवनातील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे आदी उपस्थित होते

 

 
 
 
 

पिंपरी चिंचवड मनापा वर्धापणदिन वेशभूषा स्पर्धा

   

मनपा कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी व नगरसदस्य यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये रस्सीखेच, संगीत खुर्ची, रांगोळी, पाककला, व फॅन्सीड्रेस स्पर्धा यांचा समावेश असणार आहे. यावेळी रक्तदान व नेत्रदान शिबीराचेही उद्घाटन होणार आहे. त्यानंतर महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मनपा भवनात होणार आहे. तसेच दुपारी १२.०० वाजता अभिरुप महासभा होणार आहे.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे दुपारी १२.०० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३.०० वाजता महापालिका कर्मचारी, अधिकारी व पदाधिका-यांचा गीत संगीत हा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता यशस्वी उद्योजक, गुणवंत कामगार व मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. चला हवा येऊ दया फेम श्रेया बुगडे व कुशल बद्रिके यांच्या कार्यक्रमाने वर्धापन दिनाची सांगता होणार असून नागरिकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.

 
 
 
 

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा हिंद व भारत केसरी मल्ल जोगिंदर कुमार याने इराणच्या रेझा हैदरीवर मात करुन प्रथम क्रमांकाच्या मानाची गदा पटकावली.

या स्पर्धेतील दुस-या गटामध्ये भारताचे राष्ट्रीय पदक विजेते मल्ल प्रसाद सस्ते यांनी इराणच्या सईद मोहम्मद घोली यांना पराभूत करुन विजेतेपद पटकाविले. तिस-या गटामध्ये भारताचे राष्ट्रीय पदक विजेते राजू हिप्परकर यांनी इराणच्या जावेद शबानी यांना पराभुत करुन विजेतेपद पटकाविले. चौथ्या गटामध्ये राष्ट्रकुल सूवर्ण पदक विजेते भारतीय मल्ल राहूल आवारे यांनी इराणी मल्ल जलाल शबानी यांच्यावर मात करुन विजेते पद मिळविले. तसेच पाचव्या गटामध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत हिंद केसरी भारतीय मल्ल जस्सा पट्टी यांनी राष्ट्रीय पदक विजेते किरण भगत यांच्यावर मात करत विजेतेपद पटकाविले

हजारों क्रिडा रसिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कुस्ती स्पर्धेला सकाळपासुनच प्रारंभ झाला. एक दिवसिय आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्रासह देश भरातुन नामवंत मल्लांनीही उपस्थिती दर्शविली

 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in