पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-मे २०१७
 

महाराष्ट्र्रदिन ध्वजावंदन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
आज सकाळी ७ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, नगरसदस्या निकिता कदम, मीनल यादव, शर्मिला बाबर, प्रियांका बारसे, यशोदा कोहिनवार, नगरसदस्य सुरेश भोईर, चंद्रकांत नखाते, राजेंद्र गावडे, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील,प्रवीण तुपे, रविंद्र दुधेकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, सहाय्य्क आयुक्त मिनिनाथ दंडवते, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, विशाल कांबळे, प्रदीप पुजारी, वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख, प्रशासन अधिकारी जयश्री काटकर, रेखा गाडेकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, अग्नीशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आरोग्याधिकारी, एम.एम. शिंदे, गणेश देशपांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

 
 
 
 

आढावा बैठक

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई दि. ३१ मे पर्यत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिले.
आरोग्य विभाग व सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत आज आढावा बैठक त्यांनी घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, चंद्रकात खोसे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदिप खोत यांच्यासह सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते

 

 

     
 
 
पिंपरी चिंचवड शहरात एकूण १९२ नाले आहेत. त्यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ४२ नाले असून त्यापैकी २९ नाल्यांची साफसफाई महानगरपालिका कर्मचा-यांकडून करण्यात येत आहे. ब क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ३० नाले तर क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ४० नाले आहेत. ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत १४ नाले, ई क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ३२ नाले तर फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ३४ नाले आहेत. या सर्व नाल्यांची साफसफाई दि. ३१ मे पर्यंत पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिले
 
 

आषाढी पालखी सोहळा २०१७ नियोजन आढावा बैठक

   

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या यशस्वी संयोजनासाठी महापालिका प्रयत्न करत असून स्वंयसेवी संस्था व संघटनांनीही सहकार्य करावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढी पालखी सोहळा २०१७ चे यशस्वी नियोजन करण्यासाठीच्या पदाधिकारी, अधिकारी, स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या समवेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीमध्ये उपस्थितांनी पालखी मार्गक्रमना मध्ये तसेच आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पोलीस मित्र संघटनेने योग्य ती मदत करावी. पालखी सोहळा शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील स्वंयसेवी संस्थेच्या स्वंयसेवकाची मदत घ्यावी

 
 
पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी व भावीक यांच्या संख्येनुसार शौचालयाच्या संख्येत वाढ करावी.गरज पडल्यास खाजगी कंपन्याकडून फिरते शौचालयासाठी सहकार्य घ्यावे.पालखी मार्गस्थ झाल्यावर रस्त्याची त्वरित स्वच्छता करावी
 
 

राज्याचे मुख्य सचिव मा.सुमित मल्लिक यांचा दौरा

   

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे येथील शेल्टर असोसिएट या संस्थेमार्फत व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) बालाजीनगर परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेली शौचालये म्हणजे महाराष्ट्र नव्हे  देशासाठी उत्तम उदाहरण ठरले आहेत. लोकप्रतिनिधी, शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक एकत्र आल्यास काय घडू शकते, हे बालाजीनगरमधील शौचालयांच्या प्रकल्पाने दाखवून दिले आहे. अशा प्रयोगातून महाराष्ट्र नव्हे, तर देश शंभर टक्के हागणदारीमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी पुण्यातील शेल्टर असोसिएट या संस्थेने सीएसआरच्या माध्यमातून भोसरी, बालाजीनगर येथील झोपडपट्टीमध्ये सुमारे १ हजार ५०० वैयक्तिक शौचालये उभारली आहेत. या शौचालयांची राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी शनिवारी पाहणी केली. त्यांनी शौचालयाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. महिला लाभार्थ्यांना त्यांनी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका व शेल्टर असोसिएट या संस्थेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

 
 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

   

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजाने प्रगती साधली आहे. समाज अजून प्रगतशील कसा होईल याकडे समाजातील उच्च शिक्षितांनी काम करायला हवे असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

महापौर नितीन काळजे म्हणाले, सर्व समाजात शिक्षणाबाबत जनजागृती झाली पाहिजे त्यासाठी समाजातील उच्च शिक्षित अधिकारी वर्गाने समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाकामी काम केले पाहिजे. समाज शिकून संघटीत कसा होईल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे असेही ते म्हणाले.

 
 

आज सकाळी झालेल्या संगीतमय कार्यक्रमातंर्गत सारेगमप फेम रोहित राऊत व योगिता गोडबोले यांनी धनगरी ओव्या गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला. तसेच गजनृत्य प्रमुख अनिल कोळेकर व त्यांचा संच यांनी धनगरी गजनृत्य सदर केले. दरम्यान पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील ग्रेड सेपरेटरचे नामकरण महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले

 
 

अहिराणी संमेलनाचे उद्घाटन

   

अहिराणी भाषेवर संशोधन अथवा पी.एच.डी करणा-यांना शासनाकडून शिष्युवृत्ती देण्यासाठी तसेच अहिराणी भाषेला राज्यात महत्वाचादर्जा प्राप्त करुन देण्यासाठी जरुर ते प्रयत्न केले जाईल असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिक मंत्री, विनोद तावडे यांनी केले.


भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय पाचवे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते

 

 
 
दरम्यान उद्घाटन समारंभापुर्वी सकाळी पी.एम.टी. चौक ते नाट्यगृहा पर्यंत ग्रंथ दिडी पारंपारिक नृत्यासह काढण्यात आली होती. या ग्रंथ दिंडी मध्ये भारतीय राज्य घटना तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्य सह अनेक अहिराणी साहित्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर नाट्यगृहामध्ये निकिता बागुल व त्यांच्या सहकार्यांनी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर कवी बापूसाहेब पिंगळे यांच्या “गवसले सुर” या काव्यसंग्रहाचे तसेच अहिराणी कस्तुरी या विशेषकांचेही प्रकाशन करण्यात आले.
 
 

सांगवी उड्डाण पूल

   

 

 

 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in