पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-मे २०१६
 

महाराष्ट्र्रदिन ध्वजावंदन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.  

आज सकाळी ७ वाजता झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त राजीव जाधव, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, इ प्रभाग       अध्यक्षा श्रध्दा लांडे, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, नगरसदस्य राम पाञे, शहर अभियंता एम. टी. कांबळे, सह शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्य्क आयुक्त     डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रशांत खांडकेकर, डॉ. यशवंत माने, भानुदास गायकवाड, प्रविण अष्टीकर, सुभाष माछरे, योगेश कडूसकर, चंद्रकांत खोसे, आशादेवी दुर्गुडे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर, मुख्यलेखापाल प्रमोद भोसले, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर, रामदास तांबे, दिलीप सोनवणे, संगणक अधिकारी निळकंठ पोमण, अग्नीशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
 
 
 
 

नवनिर्वाचित आयुक्तांचे स्वागत

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी स्विकारला.

१९९४ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेले दिनेश वाघमारे यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते.

रत्नागिरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवेला प्रारंभ केल्यानंतर १९९८ ते १९९९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

      सन १९९९ ते २००१ मध्ये यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर तर २००१ ते २००५ दरम्यान बुलढाणा येथे जिल्हाधिकारी पदावर त्यांनी कामकाज पाहिले. २००५ ते ऑक्टोबर २००६ मध्ये नागपूर येथे नागपूर सुधार प्रन्यासचे ते अध्यक्ष होते. २००६ ते २००७ दरम्यान लंडन येथील ब्रॅडफोर्ड विश्वविद्यालय येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले.
 
 
२००७ ते २००८ दरम्यान ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत होते. २००८ ते २००९ दरम्यान त्यांनी अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून काम पाहिले. जुलै २००९ ते जानेवारी २०१० मध्ये ते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव होते. जानेवारी २०१० ते जानेवारी २०११ दरम्यान ते अमरावती येथे विभागीय आयुक्त या पदावर कार्यरत होते. . जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०१२ दरम्यान त्यांनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव त्यांनी पदावर काम पाहिले. सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई येथे व्यवस्थापकिय संचालक म्हणून काम पाहिले. आयुक्त दिनेश वाघमारे यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये बुलढाणा येथे राबविण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट साक्षरोत्तर कार्यक्रमासाठी २०१४ साली उपराष्ट्रपती यांच्या हस्ते “सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्कारा” ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शहरी पाणीपुरवठा क्षेत्र या विषयावरील प्रबंधासाठी ब्रॅडफोर्ड विश्वविद्यालय, लंडनव्दारा एम.एस.सी पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काम करताना ई-शिष्यवृत्तीच्या सर्वोत्कृष्ट नियोजनासाठी ई-इंडिया या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे
 
 

शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप

   

“महापालिका परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन मिळून महापालिका परिसरातील जास्तीत जास्त राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने दरवर्षी क्रिडा शिष्यवृत्ती दिली जाते त्याचा सर्व विद्यार्थी खेळांडूनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा”, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.

यावेळी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता राज्यस्तर, आंतर विद्यापीठ, राष्ट्रीय स्तरावरील १६५ विद्यार्थी खेळांडूना सुमारे ६ लाख ५ हजार रुपये च्या शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 
 
यामध्ये ९९ राज्यस्तरीय विद्यार्थी खेळाडूना प्रत्येकी ३ हजार रुपयाप्रमाणे २ लाख ९७ हजार रुपयाचे धनादेश तर आंतरविद्यापीठ स्तरावरील ११ विद्यार्थी खेळांडूना प्रत्येकी ३ हजार रुपयाप्रमाणे ३३ हजार रुपयांचे धनादेशाचे तसेच राष्ट्रीय स्तरावरील ५५ विद्यार्थी खेळांडूना प्रत्येकी ५ हजार रुपयाप्रमाणे २ लाख ७५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 
 

प्रभाग क्र.६० मधील मॉडेल वॉर्ड कामांचा शुभारंभ

   

ग्रामीण भागातील मुलांना संधी दिली तर ते त्या संधीचे सोने करुन दाखवितात हे सैराटच्या माध्यमातून कलावंतांनी दाखवून दिले आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करताना कष्ट करण्याची गरज आहे. व्यसनांमुळे कुटूंब उध्वस्त होते मात्र कुटूंब उभारण्यासाठी पिढयान् पिढया लागतात याचा विचार सर्वांनी करायला हवा असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.६० मधील सांगवी येथील पवारनगर, ममतानगर व लक्ष्मीनगर येथील रस्त्यांचा मॉडेल वॉर्ड पध्दतीने विकास करण्याच्या कामांचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 
 
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, “जनतेचा पाठिंबा ज्या चित्रपटाला अथवा मालिकेला मिळतो ते यशस्वी होतात. उदाहरणार्थ; चित्रपट सैराट व टि.व्ही मालिका जय मल्हार इ. प्रत्येक क्षेत्रात काम करताना कष्ट करावे लागतात. यशाच्या मागे अपार कष्ट असतात.
 
 

मा.मुख्यमंत्री साहेबांकडे प्रलंबित असलेल्या विविध विषयाबाबत बैठक

   

राज्यातील १० शहरांपैकी एखादे श्हर वगळल्यास प्राधान्याने पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये सामाविष्ट केला जाईल, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सांगितले.

आज विधानभवन, पुणे येथे राज्य शासन व केंद्र शासनाकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रलंबित असलेल्या विविध विषयाबाबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आय.टी.बॅक बोन इंन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्राधान्याने सुरू करावा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, गायरान जमिन महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याबाबत प्रस्ताव तपासून घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

 
 
पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. बोपखेल रस्त्यासह संरक्षण विभागाशी संबंधीत प्रश्नाबाबत संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात चार पोलिस आयुक्तालये करण्याचा विचार असून त्यामध्ये प्राधान्याने पिंपरी चिंचवड शहराचा समावेश असेल. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सात गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव तपासून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बी.आर.टी रस्त्यांलगतची विकास कामे व शहराच्या कलम ३७ अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजूरी देण्याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांना सुचना देण्यात आल्या
 
 

मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

   

भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क प्रत्येक नागरिकाने मनपा सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये बजाविण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी व जनजागृती मोहिम राबवावी असे आवाहन निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले.

मतदार नोंदणी व जनजागृती अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयातील प्राचार्य व प्रतिनिधी यांच्यासमवेत स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते

 
 
एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांवर मतदार जागृतीची जबाबदारी देण्यात यावी. मतदार नोंदणी व जागृतीबाबत उत्कृष्ट काम करणा-या एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांबरोबरच महाविदयालयांना प्रमाणपत्र दिले जातील. ३१ मे पर्यंत महाविद्यालयाने नोडल ऑफिसरची नावे व वेळापत्रक निवडणूक कार्यालयाकडे पाठवावे.
 
 

आषाढीवारी पालखी सोहळ्याबाबत

   

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणे आवश्यक त्या सेवा सुविधा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे व अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत संत तुकाराम पालखी सोहळ्याचे २८ जून २०१६ रोजी आगमन होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जून २०१६ रोजी आगमन होणार आहे

 
 
या पालखी मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याच्या सुचना अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी या बैठकीत अधिका-यांना केल्या. तसेच आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्य़क त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वारक-यांची निवास व्यवस्था करण्य़ाबरोबरच खाजगी शाळांची मागणीही करण्यात येईल. स्वच्छतागृह व विद्युत व्यवस्थेसह, सीसीटीव्ही कॅमेरे व संपुर्ण व्यवस्था महानगरपालिकेच्या अधिका-यांनी वेळेत पुर्ण करावी अशाही सुचना अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी बैठकीत दिल्या. देहू संस्थानांचे विश्वस्त मोरे महाराज म्हणाले, पिंपरी चिंचवड मध्ये वारक-यांना कोणतीही उणीव भासत नाही. पालखी सोहळा स्वागत व निवास ठिकाणी वैद्यकिय पथक व रुग्णवाहिकेची सोय करावी. मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवावी. शाळा इमारतीतील समन्वयकाच्या मोबाईल नंबरची डायरी उपलब्ध करुन देण्यात यावी. मनपाच्या वतीने पाणी टॅकरची संख्या वाढविण्यात यावी. असे मत देहु संस्थानाचे सुनिल मोरे यांनी व्यक्त केले. तर चुकलेल्या लोकांना सहकार्य करण्यासाठी पोलिसांनी कक्ष उभारावा अशी सुचना रामभाऊ मोरे यांनी मांडली
 
 

मंत्रालयीन अवर सचिव भेट दौरा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या २३ मंत्रालयीन अवर सचिव सदस्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले.

शिष्टमंडळाने मोशी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सेक्टर नं.२३ जलशुध्दीकरण प्रकल्प व स्काडा प्रणाली प्रकल्पास भेट देवून तेथील माहिती जाणून घेतली

 
 
मोशी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती उपअभियंता मनोहर जावरानी यांनी तर से. क्र. २३ येथील जलशुध्दीकरण प्रकल्प व स्काडा प्रणालीची माहिती कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांनी या पथकाला दिली.
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in