पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-मार्च २०१७
 

मा .महापौर / मा. उपमहापौर निवड

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी नितीन काळजे यांची तर उपमहापौर पदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी जाहिर केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी ही निवड जाहिर केली.
आज सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या निवडणूकीत महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या शाम लांडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने व महापौर पदासाठी नितीन काळजे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केले.


 
 
 
 

जागतिक महिला दिनानिर्मित्त कार्यक्रम

   

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभागृहामध्ये दिनांक ०८/०३/२०१७ रोजी जागतिक महिला दिनानिर्मित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
झोपडपट्टी परिसरामध्ये ‘महिला बचत गट’ भारत स्वच्छ मिशनमध्ये हिरीरीने भाग घेतात, अशा बचत गटाच्या महिलांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी, अध्यक्ष, सौ. आशा सुपे व महिला बालकल्याण सभापती, सौ. अनुराधा गोफणे व नगरसदस्या सौ. विनयाताई तापकीर हजर होत्या. बचत गटाच्या महिला सौ. रुक्साना आलेनबी अन्सारी, सौ. निर्मला राणोजी खरात, सौ. मंगल शिवाजी उकीरडे, सौ. संगिता मलारी गुंड, सौ. परिगा किसन पवार व सौ. शैला गुलाब आदक यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहा.आयुक्त श्री. चंद्रकांत इंदलकर यांनी केले. व संपुर्ण कार्यक्रमाचे सुम संचालन श्री. पी.आर. तावरे यांनी केले

 
 
 
 

Smart city web site / Mobile app उद्घाटन

   

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत समावेश करणेत आलेला असून आपले शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अभियानाअतर्गत निश्चित केलेल्या मुलभुत सेवा सुविधांचा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत.शहराचा “स्मार्ट सिटी” च्यादृष्टीने आराखडा तयार करताना शहरातील नागरिकांच्या गरजांनुसार तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना प्राधान्यक्रमाने ज्या सुविधा गरजेच्या वाटतातत्या सर्व स्मार्टसिटीच्या आराखड्यात समाविष्ठ करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नागरिकांना आपली “स्मार्ट सिटी” कशी असावी याबाबत महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सूचना व मते जाणून घेण्यास प्रारंभ केला असून नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रथमत: प्रायोगिक तत्वावर शहरातील एखाद्या परिसराची निवड करावी लागणार आहे ज्या ठिकाणी सदरची योजना कमीत कमी कालावधीत राबविणे शक्य होईल व तद् नंतर संपुर्ण शहरात त्याची पुनर्रावृत्ती सहज व सुलभतेने करणे शक्य होईल. त्यादृष्टीने नागरिकांना त्यांच्या सूचना व मते नोदविण्यासाठी महापालिकेमार्फत www.smartcitypimprichinchwad.in यानावाने संकेतस्थळाची निर्मिती करून नागरिकांना Online Polls या लिंकद्वारे आपली मते व सूचना देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. त्याचबरोबर मोबाईलधारकांची प्रचंड मोठी संख्या विचारात घेता नागरिकांना सहजतेने आपली मते व सूचना नोदविणेकरीता महापालिकेमार्फत मोबाईल अँप Smart City PCMC यानावाचे अँन्ड्रॉईड बेस मोबाईल अँप तयार केलेले असून सदरचे अँप Play Store वर उपलब्ध आहे.


 
 

 

 
 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्व तयारी आढावा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत शनिवार दि. १८ मार्च २०१७ रोजी दु. ४.०० वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
या बैठकीस सर्व पदाधिका-यांसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिका-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in