पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-मार्च २०१६
 

स्थायी समिती सभापती निवड

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी हिरानंद उर्फ डब्बु आसवानी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी बिपिन शर्मा यांनी जाहिर केले.
आज सकाळी साखर आयुक्त बिपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली.
या बैठकीला नगरसेवक नारायण बहिरवाडे, ॲड. संदीप चिंचवडे, संजय वाबळे, धनंजय आल्हाट, संपत पवार, रोहित काटे, नगरसेविका सविता साळुंखे, अमिना पानसरे, वैशाली जवळकर, शुभांगी लोंढे, सुमन नेटके, अनिता तापकीर, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहआयुक्त दिलीप गावडे, नगरसचिव उल्हास जगताप, कायदा सल्लागार सतीश पवार आदि उपस्थित होते.



 
 
त्यानंतर महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, योगेश बहल, माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी श्री. आसवानी यांचे अभिनंदन केले.
 
 

ब क्षेञीय कार्यालय क्षेत्रसभा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेञीय कार्यालयाच्या कार्यक्षेञातील प्रभाग क्र. ५० थेरगाव गावठाण, अनुसया मंगल कार्यालय येथे नगरसदस्या झामाबाई बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसदस्य निलेश बारणे यांच्या उपस्थितीत क्षेञसभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग क्र. ५० मधील थेरगाव गावठाण, अनुसया मंगल कार्यालय येथे गुरुवार दि. ३ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित क्षेञसभेस माजी नगरसदस्य सिध्देश्वर बारणे, क्षेञीय अधिकारी सुभाष माछरे, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, उपअभियंता नितीन निंबाळकर, आर.व्ही. डुंबरे, सहाय्यक अभियंता MSEBCL एस.एस. पोळ, सहाय्यक मंडलाधिकारी शरद मानकर, सहाय्यक आरोग्याधिकारी के.डी. दरवडे, कनिष्ठ अभियंता सुनिल अहिरे, दिपक कदम, सतीश तावडे, एस.एम. मगर, संदिप पाडवी, मुख्य आरोग्य निरिक्षक गणेश देशपांडे, राजेश भाट, आरोग्य निरिक्षक श्री. हिवरे, क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल तसेच संबंधित अधिकारी व कर्मचा-यांसह १०० ते १५० नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
प्रभागातील उपस्थित नागरीकांनी स्थापत्य व पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, विद्युत, पर्यावरण, नदीसुधार, ड्रेनेज लिकेजच्या समस्या, डेंग्यू जनजागृती, रस्त्यावरील स्पीड ब्रेकर, टँकरचा दुषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा, धुरीकरण तसेच इतर समस्या लेखी स्वरुपात सादर केल्या. त्याचप्रमाणे थेरगाव गावठाणामध्ये कुस्तीच्या आराखडयाचे नियोजन करावे. अस्वच्छ रस्ते स्वच्छ करुन घ्यावे अशाही महत्वाच्या समस्या मांडल्या क्षेञीय सभेला नागरीकांचा प्रचंड उत्साह व प्रतिसाद दिसून आला. उपस्थितांनी क्षेञसभेचे आयोजन केलेबाबत व क्षेञसभेत नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाबद्दल महापालिकेचे आभार मानले
 
 

स्वरसागर पुरस्कार

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वरसागर संगीत महोत्सव आणि संगीत अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासण्यासाठी योगदान देत आहे ही महत्वपूर्ण बाब असल्याचे मत प्रसिध्द कथ्थक नृत्यांगणा पद्मश्री सुनयना हजारीलाल यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. ६ ते ९ मार्च २०१६ या कालावधीत स्वरसागर स्वरसागर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी त्यांना स्वरसागर पुरस्कारने महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

 
 

यावेळी पंडित पदमाकर कुलकर्णी पुरस्कार शर्वरी डिगरस पोफळे यांना देण्यात आला. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते महोत्वाचे उद्घाटन झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुरस्कार देऊन जो गौरव केला आहे त्याचा मी अती नम्रतापूर्वक स्विकार करते असेही पुरस्कार विजेत्या सुनयना हजारीलाल यावेळी म्हणाल्या. यावेळी आयुक्त राजीव जाधव, पक्षेनेत्या मंगला कदम व महापौर शकुंतला धराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

 
 

स्वरसागर

   

स्वरसागर महोत्सवाच्या तिस-या दिवशी मंगळवार(दि. 8 मार्च) पहिल्या सत्रात स्थानिक कलाकारांचे गायन व वादन झाले. यावेळी अभयसिंह वाघचौरे यांनी राग बागेश्री सादर केला. त्यानंतर त्यांनी 'घेई छंद मकरंद' हे नाट्यपद सादर केले. सुनील पाटील यांनी माऊथऑर्गन वादन केले. बीना जैन हिने सिंथेसायझरवर दोन गीते सादर केली. तसेच स्नेहा कुलकर्णी हिने राग बागेश्री सादर केला. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर द्वयीने अजरामर केलेले 'बाजे रे मुरलिया बाजे' हे भजन सादर केले.

त्यानंतर युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी राग 'पटदीप' सादर केला. त्रितालात निबद्ध असलेल्या मध्यलयीत बडा ख्याल आणि द्रुतलयीतील त्यांचे जोरकस आणि दमदार गायन रसिकांना आश्वासक गायकीचा प्रत्यय देऊन गेले. कृष्णेंद्र यांचा भरदार स्वर आणि तयारीचे गायनाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. 'देह जावो अथवा राहो' या अभंगाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांनी संवादिनीची समर्पक साथ उमेश पुरोहित यांनी व दमदार तबलासाथ संतोष साळवे यांनी केली. टाळांची साथ विश्वास कळमकर यांनी केली.

 
 
यावेळी पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका वनिता थोरात, माजी नगरसेवक एकनाथ थोरात, डॉ. पं. नंदकिशोर कपोते, कुशाग्र कदम, गौरव कदम, तेजश्री अडिगे उपस्थित होते. या महोत्सवाचे नियोजन सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजन कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सचिन मोरे, सुरेखा कुलकर्णी व महापालिकेचे संगीत शिक्षक यांनी  केले आहे.
 
 

जागतिक महिला दिन

   
मातृत्वाची जबाबदारी घेणा-या मातेबद्दल पित्याने कर्तृत्वाची जबाबदारी शंभर टक्के स्वीकारलीच पाहिजे, असे मत केंद्रीय उत्पादन शुल्काच्या उपआयुक्त वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे पेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती गीता मंचरकर, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, फ प्रभाग अध्यक्षा शुंभांगी बो-हाडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रशांत खांडकेकर, चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, जयश्री काटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा घोगरे, डॉ.बाळासाहेब होडगर, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशिला जोशी, रोहिणी गव्हाणकर, अंबर चिंचवडे, मधुकर रणपिसे, म्हस्के ब्रदर्स, किशोर केदारी आदी उपस्थित होते
 
 

दरम्यान, महापालिकेत २५ वर्ष सेवा झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच महानगरपालिकतर्फे कुष्ठरोग्यांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले तद्नंतर एल.एस.जी.डी मध्ये विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या महिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार सायली कुलकर्णी लिखित “आम्ही सावित्रीच्या लेकी” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

 
 

महापौर चषक जिल्हास्तर व्हॉलिबॉल (पासिंग) स्पर्धेचे उद्घाटन

   
विविध प्रकारचे खेळ खेळल्याने शरीराचा सर्वांगीण व्यायाम होऊन प्रकृती तंदुरुस्त राहते. त्यासाठी शहरात असलेल्या महानगरपालिकेच्या विविध क्रिडांगणात सुधारणा करण्यात येऊन ती लवकरच अद्यावत केली जातील व त्याचा लाभ खेळाडूंनी घ्यावा”, असे आवाहन क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती समीर मासूळकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, दि.१७ ते १९ मार्च, २०१६ या कालावधीत विनायकनगर, बो-हाडेवाडी, मोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक जिल्हास्तर व्हॉलिबॉल (पासिंग) स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते
 
 
महापौर चषक जिल्हास्तर व्हॉलिबॉल (पासिंग) स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, बारामती, सासवड येथील एकूण १६ संघ सहभागी झाले असून यामध्ये १२ पुरुष संघ व ४ महिला संघ यांचा समावेश आहे
 
 

जलदौड(Run For Water)

   
ज्या ठिकाणी पाणी असते तेथे सजीवसृष्टी निर्माण होते तसेच पाणी व संस्कृतीचे अतूट नाते निर्माण होते. त्यासाठी जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पाटबंधारे विभाग पुणे यांच्या वतीने जलजागृती सप्ताहांतर्गत निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे जलदौड(Run For Water)चे आयोजन आज करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.
महापौर शकुंतला धराडे यांचे हस्ते जल कलशाचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर आर.एस.कुमार, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसदस्य शरद ऊर्फ राजू मिसाळ, भारती फरांदे हे उपस्थित होते
 
  आयुक्त राजीव जाधव यांनी पाण्याचे बचत ही आवश्यक आहे गंगा, यमुना या नदयांच्या काठी प्रारंभी वस्ती निर्माण झाली आणि सिंधु संस्कृतीचाही उगम तशाच प्रकारे झाला. आज निसर्गाच्या असंतुलनामुळे पर्जन्याचे प्रमाण कमी झाले असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले. महापौर शकुंतला धराडे यांनी पाणी हे महत्वाचे आहे त्यासाठी अशाच प्रकारची मोहिम राबविणे आवश्यक आहे असे सांगून जलसंवर्धन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले  
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in