पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जून २०१७
 

ओला, सुका व घरगुती घातक कचरा विलगीकरण मोहिमेचा शुभारंभ

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत क्र.२८, रोजलँड हौसिंग सोसायटी, पिंपळे सौदागर येथे ओला, सुका व घरगुती घातक कचरा विलगीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दि. ०५ जून २०१७ रोजी सकाळी ८.00 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच E-Waste बाबत जनजागृतीपर कार्यक्रम ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे सायं. ४.०० वा. आयोजित करण्यात आलेला आहे

या कार्यक्रमास पालक मंत्री गिरीश बापट हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार अमर साबळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ऍड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान ब्रँन्ड अँबेसिडर अंजली भागवत (आंतरराष्ट्रीय नेमबाज) हे उपस्थित राहणार आहेत

 
 

तसेच ओला, सुका व घरगुती घातक कचरा विलगीकरण मोहिमेचा प्रारंभ सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात येणार आहे

    
 
 

हवा प्रदूषण नियंत्रक युनिटचे (यंत्र) उद्घाटन

   

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सहभागातून प्रॉडक्ट डिझाईन व ॲटोमेशन सेंटर या संस्थेमार्फत हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी बसविण्यात आलेल्या हवा प्रदूषण नियंत्रक युनिटचे (यंत्र) उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत असून वाढत्या वाहतूकीमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. वाढत्या हवेच्या प्रदुषणाच्या दुष्परिणामामुळे दिवसेंदिवस शहरामध्ये लहान मुले तसेच जेष्ठ नागरीकांना फुफुसाचे आजार तसेच अस्थमा यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करुन हवा शुध्द करुन सोडणारी यंत्रणा ठिकठिकाणी बसविणे आवश्यक आहे

 

 
 
प्रॉडक्ट डिझाईन व ॲटोमेशन सेंटर या संस्थेने, पिंपरी चिंचवड शहरामध्ये खाजगी सहभागातून ठिकठिकाणी मुख्य चौकांमध्ये, बस स्टेशन्स, रुग्णालये, जास्त रहदारीच्या कमीत कमी वीस ठिकाणी अशा प्रकारची २०० हवा प्रदूषण नियंत्रक युनिट मोफत बसविण्याची व ती पाच वर्ष विनामोबदला चालविण्याची तयारी दर्शविली असून सदरचा खर्च सदरची कंपनी सी.एस.आर. फंडातून करणार असून या यंत्रणेचा चालन, देखभाल व दुरुस्तीचा खर्च या युनिट वरील जाहिरातीच्या माध्यमातून करणार आहे.
 
 

सार्वजनिक स्वच्छतागृहाचे हस्तांतरण

   

स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा उददेश विचारात घेऊन मे. एक्साईड इंडस्ट्रीज लि. या शहरातील नामांकित कंपनीने सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी) माध्यमातुन तरंगत्या लोकसंख्येसाठी केएसबी चौक व थरमॅक्स चौक या दोन ठिकाणी महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करुन देण्याची तयारी दर्शविली. यापुर्वी केएसबी चौक, चिंचवड येथे कंपनीमार्फत सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम पुर्ण करुन ६ एप्रिल २०१७ रोजी महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुध्द यांनी थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कंपनीमार्फत बांधलेल्या दुस-या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले.

    

 

 
 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांसाठी सी.एस.आर (Corporate Social Responsibility) अंतर्गत उदयोजक, व्यापारी, कार्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे

 
 

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

   

मुखी हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात शहरात दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांनी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे दिंडी प्रमुखांना ताडपत्री, पुष्पहार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले.
आज दुपारी ४ वाजता या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.

 

 
 
महापालिकेच्या वतीने विविध पालखी सोहळ्यासाठी सुविधा पुरविल्या आहेत. वारक-यांना निवासासाठी पालिकेच्या तसेच खाजगी शाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकिय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्या बरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अँम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत

   

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लाखो वारक-यांसह पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आगमन झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी दिघी मॅगझीन चौक, आळंदी फाटा, भोसरी येथे दिंडी प्रमुखांना ताडपत्री, पुष्पहार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे, नगरसदस्य विकास डोळस, सचिन भोसले, रवी लांडगे, विलास मडीगेरी, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, नगरसदस्या प्रियंका बारसे, आरती चोंधे, योगीता नागरगोजे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त प्रविण अष्टीकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 
 

 

 
 

आयुक्तपदाचा पदभार श्रावण हर्डीकर यांनी स्विकारला

   

रोपे आपल्या दारी या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप ,महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,आदी मान्यवर उपस्थित होते 

 

 
 
 
Social Message by pcmc
 

ओला कचरा / सुका कचरा असे कचऱ्याचे योग्य विलगीकरण करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in