पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जून २०१६
 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

   

मुखी हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात आलेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे यांनी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे दिंडी प्रमुखांना विठ्ठल रुख्मिनी शिल्प, वृक्षारोपन बियांचे बॉक्स, हार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले.

आज सायंकाळी ५.३० वाजता या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्यावतीने सन्मानीत करण्यात आले.

महापालिकेच्यावतीने विविध सुविधा पुरविल्या आहेत. वारक-यांना पालिकेच्या तसेच खाजगी शाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकिय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्या बरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अँम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 
 
उद्या बुधवार दि.२९ जून २०१६ रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. या पालखीचेही स्वागत महापालिकेच्यावतीने महापौर शकुंतला धराडे व सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
 
 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी

   

भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगांच्या तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लाखो वारक-यांसह पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आगमन झाले

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापौर शकुंतला धराडे व खासदार श्रीरंग बारणे यांनी दिघी मॅगझीन चौक, आळंदी फाटा, भोसरी येथे दिंडी प्रमुखांना विठ्ठल रुख्मिनी शिल्प, वृक्षारोपन बियांचे बॉक्स, हार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले

आज सकाळी १०.३० वाजता या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. लाखो

  वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्यावतीने सन्मानीत करण्यात आले.
 
 
यावेळी ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, इ प्रभाग अध्यक्षा श्रध्दा लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, नगरसदस्य वसंत लोंढे, संजय वाबळे, ऍड. नितीन लांडगे, दत्तात्रय साने, नितीन काळजे, विश्वनाथ लांडे, नगरसदस्या विनया तापकीर, मंदा आल्हाट, अनुराधा गोफणे, सुरेखा गव्हाणे, सुनिता गवळी, आशा सुपे, शुभांगी लोंढे, माजी उपमहापौर सुदाम लांडगे, माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे, माजी नगरसदस्य पंडीत गवळी, अमृत प-हाड, माजी नगरसदस्या शकुंतला साठे, सहाय्यक आयुक्त सुभाष माच्छरे, आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, जीवन गायकवाड, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 

विठ्ठल रुख्मिनी शिल्प देऊन स्वागत

   

“विठ्ठल रुख्मिनी शिल्प देऊन स्वागत

 

 

 
 
 
 

मा. आयुक्त यांचा नाले पाहणी दौरा

   

क” क्षेञीय कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या पॉलीग्रास मैदाना मागील होम चेंबर कंपनी जवळील नाला, सन्ना वजन काट्याजवळील नाला, बालाजीनगर झोपडपट्टीच्या लगतचा नाला इ. नाल्यांची समक्ष पाहणी करुन नाल्यांच्या सद्यस्थितीनुसार संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना नाल्यांच्या दोन्हीं बाजूला वाढलेली झुडपे काढून नाल्यात अडकलेल्य प्लास्टिकच्या पिशव्या काढून टाका, नाल्याच्या पाणी प्रवाहाला अडचण निर्माण करणा-या एम.एस.ई.बी. च्या केबल त्याचप्रमाणे मनपा पाण्याच्या पाईप लाईनच्या खाली अडकलेल्या कच-याची व राडारोड्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करा, बालाजीनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नाल्यामध्ये व नाल्याच्या बाजूला असणारा प्रचंड स्वरुपाचा कचरा व राडारोडा त्वरीत जेसीबी द्वारे काढून टाका. त्याचप्रमाणे या भागात उघड्यावर शौचास बसणा-या नागरीकांसाठी तात्काळ कंन्टेनर टाईप टॉईलेट बसवा, या टॉईलेटस् करीता पाण्याची नळ कनेक्शने बसवून द्या. अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या.

 
 
मिलिंदनगर वसाहती शेजारील नाला, पिंपरीतील झुलेलाल घाट, पिंपरी भाजी मंडई व भाजीमंडई मधील रिकाम्या असलेल्या गाळ्यांची पाहणी केली. या दौ-याअंतर्गत आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती सभापती डब्बू आसवाणी यांनी या परिसरात असलेल्या नागरीकांच्या समस्या, वाहतूकीची कोंडी, अनेक वर्षापासून रिकामे असलेले भाजी मंडईचे गाळे, मनपाच्या आराखड्याप्रमाणे पार्किंगसाठी व गाळ्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मच्छीमार्केट, मटन मार्केट, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्या समस्या मा. आयुक्त यांच्या समोर मांडल्या
 
 

चिखली येथील अतिक्रमण कारवाई

   

फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र.५ चिखली (जाधववाडी) व प्रभाग क्र. २८ मासुळकर कॉलनी येथे आज दि. ८/७/२०१६ रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये प्रभाग क्र. ५ मधील  कॉलनी क्र ३ बोल्हाईमळा गट नं ४८९ जाधववाडी चिखली येथील २ अनधिकृत विट बांधकाम व पत्रा शेड या बांधकामावर (क्षेत्रफळ अंदाजे ६५५ चौ.फुट) पाडण्यात आले व प्रभाग क्र. २८ मासुळकर कॉलनी, उद्यमनगर येथील ५ दुकानांचे अधिकृत वाढीव बांधकाम पाडणेत आले व १ टपरी (क्षेत्रफळ अंदाजे ६६५ चौ.फुट) हटविणेत आले.

सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. पठाण ए.ए. यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक  यांचे सोबत महापालिका अतिक्रमण पथक, व स्थानिक पोलिस कर्मचारी वर्ग, ०२ जे.सी.बी., ०१ डंपर, मनपा कर्मचारी व १० मजूर यांचे उपस्थितीत करण्यात आली

 

 

 
 
 
 

मंत्रालयीन अवर सचिव पाहणी दौरा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या २४ मंत्रालयीन अवर सचिव सदस्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत सहा. आयुक्त मनोज लोणकर व माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.

शिष्टमंडळाने मोशी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देवून तेथील माहिती जाणून घेतली. मोशी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती प्रविण डोळस, श्री. राठोड व राजकुमार वाघमारे यांनी या पथकाला दिली.

 
 
या शिष्टमंडळामध्ये मंत्रालयीन विविध विभागात कार्यरत असलेले अवर सचिव अनिल अहिरे, श्रीकांत अडगे, रविंद्र उते, अजिंक्य बगाडे, आंनद भोंडवे, अंबादास चंदनशिवे, दिनेश चव्हाण, संतोष गायकवाड, गजानन गुरव, स्वप्निल कापडनिस, रसिक खडसे, मनोजकुमार महाले, सतीशकुमार माळी, अशोक मंडे, चेतन निकम, प्रशांत पाटील, श्रीकृष्ण पवार, सुधाकर पवार, सोमनाथ पोटरे, विजय साबळे, रघुनाथ श्रावणपाटील, चंद्रशेखर तरंगे, मोहीनुद्दीन तसिलदार, नवनाथ वाथ यांचा समावेश होता. पाहणी दौरा शिष्टमंडळाचे समन्वयक म्हणून यशदाचे लक्ष्मीकांत चौधरी यांनी काम पाहिले.
 
 

राज्यस्तरीय़ वकृत्व स्पर्धा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला विषयीचे धोरण व हिंदूकोड बील या विषयावरील राज्यस्तरीय़ वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी यांच्या हस्ते झाले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक ऄड. गोरक्ष लोखंडे, सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, वसंत साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
या वकृत्व स्पर्धेत राज्यभरातून ३३ स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या प्रगतीसाठी आखलेली धोरण व हिंदूकोड बीलाच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीची दालने खुले करण्याचा केलेला प्रयत्न या बाबत स्पर्धेक विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये पुणे जिल्ह्यासह सांगली, बीड, औरंगाबाद, गोंदिया, नाशिक, सातारा, अहमदनगर, राजगुरुनगर अशा भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. तर नगरसेवक ऄड. गोरक्ष लोखंडे यांनी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
 
 

जागतिक योग दिन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन आचार्य अञे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे मंगळवार, दि. २१ जून २०१६ रोजी सकाळी ११.०० वा. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले.

स्ञियांचे आरोग्य चांगले तर आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते”. दिवसातील पंधरा मिनिटे तरी योगा करावा असे मत, महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले

या कार्यक्रमानिमित्त डॉ. मिलींद मोडक यांचे ‘सूर्य नमस्काराचे महत्व’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. चारुलता बापये ह्या ‘योग आणि स्ञियांचे आरोग्य’ या विषयावर संवाद साधणार आहेत. प्रा. विदुला शेंडे यांचे ‘योग आणि सौंदर्य’ या विषयावरील व्याख्यान त्याचबरोबर योगप्रात्यक्षिके व मान्यवरांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 
 
यावेळी भारतीय योग टीमचे कॅप्टन चंद्रकांत पांगारे व आंतरराष्ट्रीय पातळीवर योगामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या वैष्णवी आंद्रे, साक्षी महाले, श्रृतिका भंडारे, श्रावणी कुलकर्णी या योगपटूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी केले. सुञसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in