पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जुलै २०१७
 

वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

   

स्मार्ट सिटी हि स्मार्ट नागरिकांची असावी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटी बरोबरच ग्रीनसिटी हा मंत्र लोकांच्या मनावर पोहचवावा लागेल असे मत वन, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मिलिटरी डेअरी फार्म पिंपरी येथे आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर नितीन काळजे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे तसेच यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले तर आभार नगरसदस्य संदीप वाघेरे यांनी मानले.

 
 

यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले, मनाने माणूस वरवरचे सुख प्राप्त करू शकतो. परंतु माणसाला आंतरिक सुखाचा अनुभव घेण्यासाठी पर्यावरण पूरक वातावरण असावेच लागते. त्यासाठी वृक्षांवर प्रेम करून वृक्षारोपण व संवर्धन झाले पाहिजे. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हाथ हजारोंच्या संख्येने वाढले पाहिजेत तरच आपण या महाराष्ट्राला हरित क्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्यास यशस्वी होऊ. यावर्षी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्धीष्ट ठेवले असून आज अखेर १ कोटी ६८ लाख ७८ हजार ७४९ वृक्ष लागवड झाल्याचेही ते म्हणाले. परंतु पुढील वर्षी हे उद्धीष्ट्य १३ कोटी वृक्ष लागवडीने पूर्ण करू. असेही यावेळी ते म्हणाले.

    
 
 

वस्तू व सेवाकर कायद्याची माहिती

   

वस्तू व सेवाकर कायद्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना देण्यासाठी आयोजित कार्यशाळेचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्या हस्ते झाला.

चिंचवड येथील ॲटोक्लस्टरच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेला मुख्यलेखापाल राजेश लांडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्यलेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.अनिल रॉय, सहशहर अभियंता प्रविण तुपे, सहाय्यक आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, डॉ.प्रविण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, विजय खोराटे, अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व लेखाधिकारी, लेखापाल, उपलेखापाल उपस्थित होते.

 

 
 
वस्तु व सेवाकराबाबतच्या कायद्याची माहिती सनदी लेखापाल रुतुराज चिंगळे व स्वरुप चिंगळे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.प्रास्ताविक मुख्यलेखापाल राजेश लांडे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.
 
 

महिलांसाठीच्या विशेष बससेवेचा प्रारंभ

   

पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १३ व परिसरातील नागरिकांना वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यासाठी पी.एम.पी.एम.एल. च्या वतीने सेक्टर क्रमांक १३ ते पुणे स्टेशन व महिलांसाठीच्या निगडी ते पुणे स्टेशन या विशेष बससेवेचा प्रारंभ महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते आज झाला.

    

 

 
 

प्रारंभी सेक्टर क्रमांक १३ ते पुणे स्टेशन या बससेवेचे उद्घाटन क्रांती चौक स्पाईन रोड येथे झाले. त्यानंतर महिलांसाठी विशेष बस सेवा निगडी ते पुणे स्टेशन पर्यंत सुरु करण्यात आली. निगडी चौक येथे याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

 
 

विजेत्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीस रक्कमेत भरीव वाढ करून, प्रथम क्रमांकास ५१ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट व देखाव्याच्या स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 
परिक्षण समिती सदस्य जेष्ठ प्रत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले, स्पर्धेचा निकाल हा पूर्णपणे निःपक्षपाती असून यामध्ये कोणात्याही पदाधिका-याचा हस्तक्षेप नव्हता. स्पर्धेचे परीक्षण हि एक सामाजिक चळवळ आहे असे समजून मी काम केले आहे. गणेश मंडळांनी जिवंत देखावे सादर करताना वेळेची मर्यादा राखावी. गणेश मंडळांनी उत्स्फुर्तपणे गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.
 
 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकिय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच भक्ती शक्ती चौक, निगडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

 

 
 

आज सकाळी महापालिकेच्या मुख्यऎ प्रशासकिय इमारतीमध्ये तसेच भक्ती शक्ती चौक, निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमास, मनसे गटनेते सचिन चिखले, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, सह आयुक्त दिलीप गावडे, नगरसदस्या कमल घोलप, अनुराधा गोरखे, सुमन पवळे, नगरसदस्य उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा सन २०१७-१८ चा उद्घाटन सोहळा डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासूळकर कॉलनी, पिंपरी येथे सकाळी १०.०० वाजता सन्मा.भिमाताई फुगे,नगरसदस्या, कला क्रीडा व सांस्कृतिक समिती यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

सदर प्रसंगी मा.समीर मासूळकर, नगरसदस्य, मा.रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी, श्रीम.जयश्री साळवे, क्रीडा पर्यवेक्षिका, श्रीधरण राव, ज्येष्ठ फुटबॉल पंच, श्री रवी पिल्ले, पंचप्रमुख, श्री रंगराव कारंडे, स्पर्धा प्रमुख यांनी कामकाज पाहिले.

 

 
 
 
Social Message by pcmc
 

ओला कचरा / सुका कचरा असे कचऱ्याचे योग्य विलगीकरण करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in