पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जुलै २०१६
 

क्रांतिवीर चापेकर बंधू समूह शिल्प

   

देशाच्या स्वातंञ्यासाठी बलिदान देणा-यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिलेला आहे. म्हणूनच अशा क्रांतीवीर चापेकर बंधूसारखी स्मारकं उभी करुन त्यांच्या विचारांची दिशा तरुणांना कळावी, व यातून तरुणांनी राष्ट्र प्रेमाचा वारसा पुढे न्यावा. यासाठी अशा स्मारकांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांविरुद्ध लढताना एकाच कुटुंबातील तिघा भावंडांनी प्राणाची आहुती दिली, अशा महान क्रांतिकारक चापेकर बंधूचे जन्मस्थळ असलेल्या चिंचवडगांव येथे महानगरपालिकेच्या वतीने "क्रांतिवीर चापेकर बंधू समूह शिल्प" उभारले आहे, त्याचा अनावरण समारंभ, आज दि. ०९ जुलै २०१६ रोजी त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 
यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, अमर साबळे, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, चापेकरांचे वंशज अनुया चापेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नगरसदस्य ॲड. संदिप चिंचवडे यांनी केले स्वागतपर मनोगत नगरसदस्या अश्विनी चिंचवडे यांनी केले. सुञसंचालन प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांना केले तर आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.
 
 

भीमसृष्टी प्रकल्प

   

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या घटनेचे १२५ कोटी नागरीक पालन करतात. त्यांच्या कार्याची नवीन पिढीला प्रेरणा मिळावी. यासाठी भीमसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत असून त्यांच्या नावाला साजेशी भीमसृष्टी निर्माण होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

शनिवार, दि. ०९ जुलै २०१६ रोजी, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानामध्ये भीमसृष्टी प्रकल्पाच्या भूमीपूजन शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 
यावेळी अजितदादा पवार म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, साविञीमाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी दिशा देण्याचे काम केले आहे. यावेळी उपस्थित नागरीकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या पाठीमागे असणारी जागा भीमसृष्टीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली, माञ वाहतूकीला अडथळा येणार नाही व तेथील आरक्षणाची माहिती घेऊन त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे अनावरणही लवकरात लवकर केले जाईल. असेही त्यांनी सांगितले.
 
 

गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण चाफेकर चौक चिंचवडगाव येथे शनिवार   दि.०९ जुलै २०१६ रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले.

गणेशोत्सव स्पर्धा २०१५ मध्ये विजेत्या ठरलेल्या बक्षीस पाञ ३७ गणेश मंडळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपञक देवून करण्यात आला.

बक्षिसपाञ गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी बक्षिस स्विकारण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

 

 

 
 
 
 

मोरया गोसावी सृष्टी

   

महासाधू मोरया गोसावी यांचा जीवनपट हा भावी पिढीला मोरया गोसावी सृष्टीच्या माध्यमातून ज्ञात होईल त्यासाठी महानगरपालिकेने केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत असे मत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.

आज शनिवार दि. २३ जूलै २०१६ रोजी सकाळी चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिराशेजारील उद्यान या ठिकाणच्या श्री मोरया गोसावी सृष्टी व क्रांतीस्फुर्ती ज्योत म्युरल्सचे उद्घाटन आज महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 
संतांच्या विचारांची मांदियाळी घराघरांमध्ये पोहचविणा-या भजनी मंडळांचा तसेच       ब क्षेञीय कार्यालया मार्फत चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्याबद्दल सहा. आयुक्त सुभाष माछरे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, एकनाथ पाटील, उपअभियंता वैभव कुसाळकर, कनिष्ठ अभियंता भगवान मोरे, शिल्पकार प्रशांत गायकवाड, ठेकेदार एच.आर. गायकवाड इ. चा सन्मान महापौर शकुंतला धराडे व खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केला. मान्यवरांचे स्वागत नगरसदस्य ॲड. संदिप चिंचवडे यांनी केले, प्रास्ताविक पर मनोगत नगरसदस्या अश्विनी चिंचवडे यांनी केले, सुत्रसंचालन प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले, तर आभार ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी यांनी मानले.
 
 

वृक्षारोपण

   

महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्षारोपण करणेचे आवाहन केलेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभाग, ई क्षेत्रिय आरोग्य विभाग व संत साई हायस्कूल, भोसरी यांचे संयुक्त विद्यमाने गायत्री मंदिर परीसर भोसरी येथे आज दिनांक 01/07/2016 रोजी सकाळी 9.00 ते 12.30 या वेळेत व़ड, आंबा, नारळ इत्यादी 200 रोपांचे वृक्षारोपण करणेत आले. या प्रसंगी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक श्रीमती पद्मश्री तळदेकर, ई क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी श्री.इंदलकर, मुख्य आरोग्य निरीक्षक श्री.तावरे व मुलेप विभागातील 45 लेखापरीक्षक कर्मचारी तसेच ई आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक मुकादम व संत साई हायस्कूल, भोसरी येथील श्री.वाबळेसर व 25 मुलामुलींनी सहभाग घेतला. सदर रोपे जगविण्यासाठी वर्गणीद्वारे पाईपलाईन करुन रोपांना पाणीपुरवठा करुन रोपे जगविणेचा सर्वांनी निश्चय केला याकामी मुलेप विभागातील श्रीम.साळवी- उपलेखापाल, लेखापाल, उपलेखापाल इ. कर्मचा-यांनी पुढाकार घेतला.

 
 
 
 

दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना सोडत

   

केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील एका इमारती मधील एकूण ४२ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत उपमहापौर प्रभाकर वाघेरे व शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने यांच्या हस्ते काढण्यात आली.

या कार्यक्रमास माजी उपमहापौर राजु मिसाळ, सहा आयुक्त मिनिनाथ दंडवते, प्रशासन अधिकारी तुमराम एस.एल. तसेच मुख्य लिपिक जी.टी. यळमळे यांच्यासह मोठया संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

 
 
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्था क्र.९५, इमारत क्र.D-16 चे तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेले अध्यक्ष सोन्याबापु केदारी यांचा उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.टी.यळमळे यांनी केले. तर सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी यांनी केले
 
 

वेस्ट वॉटर रिसायकल प्लँट

   

वेस्ट वॉटर रिसायकल प्लँट सारखे प्लँट शहरात मोठया प्रमाणात निर्माण झाले पाहिजेत. असे मत माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट वॉटर रिसायकल प्लँटचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 
 
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी ७ लाख ८० हजार लिटर प्रतीदिन इतका पाणी पुरवठा होतो. त्यापैकी बहुतांश पाणी हे फायर ब्रिगेड, बांधकाम, साफसफाई, धुण्यासाठी, बाग कामासाठी व स्वच्छता गृहासाठी वापरण्यात येते. तथापि, या पाण्याची बचत होण्यासाठी वेस्ट वॉटर रिसायकल प्लँट उपयुक्त ठरणार आहेत. या लोकोपयोगी प्रकल्पामुळे पाण्याचा अपव्यय टळून पाण्याची बचत होईल. पर्यावरण पुरक असा हा प्रकल्प आदर्श ठरेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काळाच्या गरजेनुसार असे प्रकल्प शहरात विविध ठिकाणी राबविणे गरजेचे आहे. झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरण संवर्धन करा असेही ते म्हणाले. वेस्ट वॉटर रिसायकल ट्रिटमेंट प्लँट हा बायलॉजीकल ट्रिटमेंट प्रोसेस या तंत्रज्ञानावर आधारित आहे.
 
 

अतिक्रमण कारवाई

   

ई क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली

 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in