पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जानेवारी २०१७
 

भारतीय प्रजासत्ताक ६७ वा वर्धापनदिन

   

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आहे.
यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर सुधारणा समिती सभापती प्रतिभा भालेराव, ब प्रभाग अध्यक्षा आशा सूर्यवंशी, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य गोरक्ष लोखंडे, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पदमश्री तळदेकर, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, प्रवीण आष्टीकर, डॉ. महेशकुमार डोईफोडे, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, चंद्रकांत खोसे, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, पशु वैद्यकीय अधिकारी सुरेश गोरे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, आयुबखान पठाण, रवींद्र दुधेकर, विकास अभियंता अशोक सुरगुडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, मकरंद निकम, जीवन गायकवाड, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांच्यासह बहुसंख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
 
 
 

स्वच्छ भारत अभियान भिंती सुशोभिकरणाद्वारे जनजागृती

   

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१७ पिंपरी चिंचवड शहरात ७ ते ९ जानेवारी पासुन सुरु होत आहे. ‘भिंती सुशोभिकरण’, होर्डींग, माहितीपत्रक, पोस्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स इ. माध्यमाद्वारे अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी तसेच शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी ‘भिंत सुशोभिकरण’ या माध्यमातुन स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवुन जनजागृती करण्यात आली. विविध आकर्षक रंगाचा वापर करुन विविध चित्रांद्वारे व विविध घोषणांद्वारे मनपाच्या कार्यक्षेत्रामध्ये महत्वाचे चौक, शासकीय कार्यालय इ. ठिकाणी भिंती, पादचारी पूल, स्वच्छतागृह, कचराकुंडीजवळील भिंती, स्मशानभूमी, झोपडपटटी आदी गोष्टी स्वच्छ करुन घोषवाक्यासह चित्रे रंगविली गेली आहेत. यामुळे भिंतीना वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.

 

 
     
 

पी.एम.पी.एम.एल करिता बस टर्मिनल विकसित करणे

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ५७ पिंपळे गुरव येथील आरक्षण क्र. ३५० येथे पी.एम.पी.एम.एल करिता बस टर्मिनल विकसित करणे व पिंपळे गुरव येथे स्मशानभूमी नुतणीकरण या कामांचे भूमिपूजन शनिवार, दि.३१ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.


महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य राजेंद्र जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, सह शहर अभियंता राजन पाटिल, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत खोसे, माजी नगरसदस्य राजू लोखंडे, , कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद ओंभासे, बापु गायकवाड, उपअभियंता शिरीष पोरेड्डी, कार्यालय अधिक्षक विजय सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक एस.एस.गायकवाड तसेच माजी सैनिक संघाचे जेष्ठ प्रतिनिधी यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
 
 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा फुले पुतळापरिसर, पिंपरी येथे मंगळवार दि. ३ जानेवारी २०१७ रोजी सायं. ०६.३० वा. “साऊ पेटती मशाल“ या सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमास पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे माजी अधिकारी सुधिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव, रामभाऊ दराडे, ज्ञानेश्वर भुमकर, गणेश शिरसागर, प्रविण कांबळे, सुधिर जावळे, पोपट मोरे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, शब्बीर शेख, प्रविण बागलाणे, अंकुश कदम, किशोर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते

 

 
 
 
 

प्रभाग क्र. २२  चिंचवडगाव मधील रस्त्यांचे नामकरण

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २२ चिंचवडगाव मधील रस्त्यांचे नामकरण व नामफलकाचे उद्घाटन तसेच प्रकल्पांचे भूमिपूजन नगरसदस्य संदिप चिंचवडे व नगरसदस्या अश्विनी गजानन चिंचवडे पाटील यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माजी शिक्षणमंडळ सदस्य गजानन चिंचवडे, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटिल, चंद्रशेखर धानोरकर, प्रशासन अधिकारी रवि जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर आपटे, आप्पा कुलकर्णी, संतोष सौदंनकर, बाळासाहेब पडवळ, अशोक तलाठी, खंडुशेठ चिंचवडे, धोडिंबा सायकर, प्रशिक्षक माधुरी कुलकर्णी, स्नेहल सातभाई, संतोष साळवे, समीर सुर्यवंशी, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, किशोर केदारी, प्रविण बागलाणे, आकाश चव्हाण, ज्ञानेश्वर भरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चिंचवड मधील पार्किंग आराखड्याचे भूमिपूजन, पंडित पद्माकर कुलकर्णी संगीत वर्गाचे उद्घाटन, दत्तमंदिर गोखले पार्कचे भूमिपूजन, साई साठे पार्कच्या नामफलकाचे उद्घाटन, संत तुकाराम महाराज व्यासपीठाचे उद्घाटन, कै. वसंतराव जोशी मार्गच्या नामफलकाचे उद्घाटन, सदगुरू श्री. वामनराव पै. बॅडमिटन हॉलच्या फलकाचे नामकरण, चिंचवड देऊळमळा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पु.ल.कट्टा कामाचा शुभारंभ, संतश्री. गजानन महाराज व्यासपीठाचे उद्घाटन, बळवंत राघुजी चिंचवडे – महिला व्यायामशाळेचे उद्घाटन आदी कार्यक्रम संपन्न झाले.

 
 

 

 
 

भारत सरकारच्या गृहमंत्रालय व खेल आणि युवा मंत्रालयाच्या अंतर्गत

   

देशातील विविध राज्यातील दुर्गम पाहाडी, घनदाट जंगल अशा क्षेत्रात राहणा-या तरुण युवक - युवती समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भारत सरकारच्या गृहमंत्रालय व खेल आणि युवा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले नेहरु युवा संघटनेचे प्रत्यन अभिनंदनीय असल्याचे मत आयुक्त दिनेश वाघमारे यानी व्यक्त केले.
भारत सरकार, गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सी.आर.पी.एफ व नेहरु युवा संघटनेच्या वतीने झारखंड आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या पथकाने महापालिकेस भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती डब्बू आसवाणी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, नेहरु युवा केंद्राचे मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, कार्यकारणी प्रमुख मदन घिगाटे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य अँड. रसिका कुलकर्णी, समादेशक हरविंदसिंग कालस, समन्वय हितेद्र वैद्य माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 
 
 
 

१५ वा पुणे  इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

   

पुणे फिल्म फॉन्डेशन, महाराष्ट्र शासनआणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या विस्तारीत चित्रपट महोत्सवाचे पिंपरी चिंचवड विभागातील उदघाटन समारंभ कार्निव्हल सिनेमा (बीग सिनेमा) स्क्रीन नं-१, चिंचवड येथे शुक्रवार दि.१३ जानेवारी २०१७ रोजी सायं. ५ वाजता जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त दिनेश वाघमारे असतील

या उदघाटन कार्यक्रमासाठी सिने अभिनेते अजिंक्य देव व अभिनय देव तसेच डॉ.जब्बार पटेल – अध्यक्ष व संचालक पिफ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उदघाटन कार्यक्रमापूर्वी मकरंद पाटणकर व मनीषा लताड आणि सहकारी यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

उदघाटन कार्यक्रमानंतर स्व.ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच स्व.ओम पुरी यांचा ‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

 

 

 
           
     
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in