पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जानेवारी २०१६
 

भारतीय प्रजासत्ताक ६६ वा वर्धापनदिन

   

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, ब प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे, ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बो-हाडे, मनसे गटनेते अनंत को-हाळे, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, आर.एस.कुमार, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, बाबा धुमाळ, ॲड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, नगरसदस्या भारती फरांदे, अमिना पानसरे, सुजाता पालांडे, सह आयुक्त दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होत
े.

 
 
 
 

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

   

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालनामध्ये “सुंदर माझे पिंपरी चिंचवड शहर” हे शहर विकासाचे प्रतिबिंब असणारे दालन उभारले असून त्याला आज महापौर शकुंतला धराडे, सुनेत्रा अजितदादा पवार, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका शमिम पठाण, नगरसेवक प्रशांत शितोळे आदिंनी भेट दिली व महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत अभिनंदनही केले

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती असणारी चित्रफित या दालनामध्ये प्रदर्षित करण्यात आली आहे. तसेच छायाचित्रांव्दारे प्रदर्शनही या दालनात उपलब्ध आहेत. गेल्या १५ जानेवारी रोजी सुरु झालेल्या या ग्रंथ दालनातील या प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी भेट दिली असून महानगरपालिकेच्या या प्रकल्पांचे कौतुक केले आहे

 
 
स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी सहकार्य करा असा संदेश देणारे फलकही महानगरपालिकेने या साहित्य संमेलनात लावले आहेत.
पिंपरी चिंचवड या नव निर्मित पालिकेची वाटचाल अभूतपूर्व आहे. पुणे महानगराशेजारी असूनही पिंपरी चिंचवड पालिकेनी घेतलेली झेप अभूतपूर्व आहे. अशा प्रकारचे अभिप्राय नागरिकांनी या दालनाला भेट दिल्यानंतर दिले आहेत
 
 

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

   


 
 
 
 

पिंपरी चिंचवड शहर दर्शन

   

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर असुन विविध अंगाने परिपुर्ण शहर आहे, वाहतुकीची कोंडी कोठेही झाल्याचे दिसून आलेले नाही, या परिसरातील उद्याने सुस्थितीत असुन पर्यावरण अतिशय सुंदर आहे, भव्य रस्ते व उड्डाणपुल शहरात येणा-या प्रत्येक नागरिकाला मोहित करणारी आहेत. अशा भावना राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या साहित्यिकांनी व्यक्त केल्या.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यिकांसाठी पिंपरी चिंचवड शहर दर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या

पिंपरी चिंचवड शहर दर्शन करण्यासाठी दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. पहिले सत्र सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत व दुसरे सत्र दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत या कालावधीत ठरविण्यात आले होते. यावेळी सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, इचलकरंजी, मिरज, ठाणे, मुंबई इ. विविध भागातून बहुसंख्येने मान्यवरांनी या दर्शन सहलीचा लाभ घेतला. आलेल्या मान्यवरांना बी.आर.टी.एस. प्रकल्प, दुर्गादेवी टेकडी, भक्ती शक्ती शिल्प तसेच सायन्स पार्क इत्यादी ठिकाणे दाखविण्यात आली. या दर्शन सहलीमध्ये जवळजवळ २०० साहित्यिक मान्यवरांनी सहभाग घेतला

 
 
यावेळी बी.आर.टी.एस. प्रकल्पाची माहिती उपअभियंता बापू गायकवाड यांनी दर्शन सहलीमध्ये भाग घेतलेल्या कवी व साहित्यिकांना दिली. तर सायन्स पार्कची माहिती बी. टी. कासार यांनी दिली. दुर्गादेवी टेकडीवरील झाडे व उद्याने पाहून एक वेगळी अनुभूती मनाला भावते. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दर्शन सहलीत सहभागी असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केल्या. या दर्शन सहलीचे गाईड म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व प्रविण बागलाणे यांनी कामकाज पाहिले
 
 

ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन गुरुवार दि. २१ जानेवारी २०१६ रोजी दुपारी २.०० वाजल्या पासून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले

दुपारी २.०० वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होणार असून त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये इतका खर्च झाला आहे. तर दुपारी २.३० वाजता जाधववाडी – कुदळवाडी येथील हॉटेल विसावा ते सावतामाळी मंदिरापर्यंत ३० मीटरचा रस्ता विकसित करण्याच्या कामाचे भूमीपूजन होणार असून त्यासाठी सुमारे २ कोटी ५२ लाख इतका खर्च होणार आहे. तसेच दुपारी ३.०० वाजता पिंपरी, मिंलिदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीचे उद्घाटन होणार असून त्यासाठी सुमारे ५३ कोटी ८२ लाख रुपये इतका खर्च झाला आहे. तर दुपारी ३.३० वाजता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वेताळनगर, चिंचवड येथील लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण होणार असून त्यासाठी सुमारे ५७ कोटी ८५ लाख रुपये इतका खर्च झाला आहे

 
 

तसेच दुपारी ४.०० वाजता डांगे चौक थेरगाव ते वाकड अंडरपास पर्यंतच्या ४५ मीटर रुंदीच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण कामाचे भूमीपूजन होणार असून त्यासाठी सुमारे    १६ कोटी ३० लाख रुपये इतका खर्च होणार आहे. तर दुपारी ४.३० वाजता सांगवी येथील काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन होणार असून त्यासाठी सुमारे ५ कोटी ५९ लाख इतका खर्च होणार आहे. तसेच सांयकाळी ४.४५ वाजता सर्व्हे क्र. २६ मधील छञपती शिवाजी महाराज उद्यानाचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन होणार असून त्यासाठी सुमारे ३ कोटी ३५ लाख रुपये इतका खर्च झाला आहे

 
 

१४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

   

शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना मला या कामातून मरे पर्यंत जगण्याचे कारण मिळाले असल्याचे मत ज्येष्ट अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित १४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, शहर सुधारणा समिती सभापती स्वती साने, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, नगरसदस्य नारायण बहिरवाडे, प्रसाद शेट्टी, धनंजय आल्हाट, निलेश बारणे, नगरसदस्या छाया साबळे, आशा सुर्यवंशी, सुजाता पालांडे, अमिना पानसरे, विनया तापकीर, अशा सुपे, सह शहर अभियंता व मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, उपअभियंता प्रशांत पाटील, मनोज सेठीया, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते

 
 
नाना पाटेकर म्हणाले, रसिक मायबापांनी मला भरभरुन दिले आहे. चित्रपट हे केवळ करमणूकीचे साधन नसून ते प्रबोधनाचे माध्यम आहे. मला आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व पुरस्कारांपेक्षा आताचे नाम फाऊंडेशनचे काम मनाला समाधान देणारे आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्यादोन वर्षापासुन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद पाहूण काही वर्षाने हा महोत्सव पुण्याला समांतर होईल. या पिंपरी चिंचवड शहराशी माझी फार जुनी ओळख आहे. पुण्यातुन पिंपरी चिंचवड पर्यंत पाई प्रवास करत होतो. त्यावेळी मी चिंचवड येथील फकिरभाई पानसरे इमारतीमध्ये देखभालीचे काम केले आहे. या आठवणी मी कधीच विसरु शकत नाही. नटांना अनुभवाचा साठा हा समाजातुनच मिळतो. नट हा त्या त्या भुमीकेशी अंतर्मुख होऊन सुख दुख जगत असतो. नटांची पोस्टर्स जेवढया लवकर लावली जातात तेवढयाच लवकर काढलीही जातात. परंतु राजकारणातुन केलेली समाजसेवा दिर्घकालीन असते. जेंव्हा समाज नाकारतो तेंव्हा नटाची अवस्था जी असते ती अवस्था नरकमय स्वरुपाची असते, तीच अनुभुती नटसम्राट या चित्रपटातुन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील माझी भुमिका ही आतापर्यंतच्या झालेल्या सर्व भुमीकांपेक्षा सर्वश्रेष्ठ भुमिका असल्याचे मला वाटते. आता घातलेली माझी ही साधी वेशभुषा मला आवडते. कारण हा चुरगळलेला शर्ट आणि या घामाच्या वासामुळे आपली माणसे जवळ येतात. असेही ते म्हणाले
 
 

सेवा हमी कायदा

   

राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिसूचित केलेल्या १५ सेवा नागरीकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या संगणक प्रणालीचा शुभारंभ महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी झाला.

आज सकाळी महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, ब प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे, ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बो-हाडे, मनसे गटनेते अनंत को-हाळे, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, आर.एस.कुमार, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, बाबा धुमाळ, ॲड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, नगरसदस्या भारती फरांदे, अमिना पानसरे, सुजाता पालांडे, सह आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
या ऑनलाईन सेवेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील नागरीकांना महापालिका कार्यालयामध्ये न जाता निर्धारित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सेवा सुविधा घर बसल्या प्राप्त होणार आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या या ऑनलाईन १५ सेवांमध्ये जन्म प्रमाणपञ, मृत्यू प्रमाणपञ, विवाह नोंदणी, मालमत्ता कर उतारा, थकबाकी नसलेबाबत दाखला, दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण, झोन दाखला, भाग नकाशा, बांधकाम परवाना देणे, जोते प्रमाणपञ, भोगवटा प्रमाणपञ, नळ जोडणी देणे, जलनि:सारण ना हरकत दाखला, अग्निशामक ना हरकत दाखला, अग्निशामक अंतिम ना हरकत दाखला इत्यादी सेवांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सदरच्या सेवा आज दि. २६ जानेवारी २०१६ पासून नागरीकांना महाराष्ट्र शासनाचे ‘आपले सरकार’ या वेबपोर्टल मार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असून भविष्यात सदर सेवांमध्ये वाढ देखील करण्यात येणार आहे. सदरची सेवा ही महानगरपालिकेच्या वेबपोर्टलवर rts.pcmcindia.gov.in या लिंकद्वारे नागरीकांना उपलब्ध होणार आहे
 
 

ब प्रभाग अंतर्गत नागरी सेवा

   
 
     
 

स्वच्छतेचे महत्व विषद करणा-या समाजप्रबोधनपर पथनाट्यांचे सादरीकरण

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेचे महत्व विषद करणा-या समाजप्रबोधनपर पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते आज झाला.
महापालिका भवनापासून या पथनाट्याच्या प्रयोगाला प्रांरभ झाला. यावेळी आयुक्त राजीव जाधव, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, नगरसेवक रामदास बोकड, नगरसेविका सुलभा उबाळे, निता पाडाळे, मंदाकिनी ठाकरे, शिक्षण मंडळ सदस्य चेतन भुजबळ, सह आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदि उपस्थित होते.
 
  शहरातील विविध चौक व वस्त्यांमध्ये या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. परिसर स्वच्छ ठेवा, रस्त्यावर थुंकू नका, उघड्यावर शौचाला बसू नये व शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न करा, रोगराईला दूर करण्यासाठी व आरोग्य सुदृढ राखण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य द्या. अशा प्रकारचा संदेश देणारी विविध गाणी या पथनाट्याद्वारे सादर करण्यात येत आहेत  
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in