पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-फेब्रुवारी २०१६
 

शिवजयंती प्रबोधन व्याख्यनमाला

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.५ फेब्रुवारी २०१६ ते दि. ८ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता संभाजीनगर चिंचवड येथे शिवजयंती प्रबोधन व्याख्यनमालेचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ ख्यातनाम व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या ”छत्रपती शिवाजी राजे एक आदर्श व्यक्तीमत्व” या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे

 
 
संभाजीनगर चिंचवड येथे आयोजित या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, ॲड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगलाताई कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य नारायण बहिरवाडे यांच्यासह सर्व सन्मानीय पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या उपस्थित होते
 
 

स्पर्धा परिक्षांबाबत अभ्यासक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

   

प्रबळ इच्छाशक्ती,‍ कठोर परिश्रम व ध्येय निश्चिती हेच स्पर्धापरिक्षेमध्ये यशस्वी होण्याचे गमक असल्याचे मत व्याख्याते संतोष जोगदंड यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यमुनानगर, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परिक्षा केंद्रात आयोजित स्पर्धा परिक्षांबाबत अभ्यासक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे,माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी शिवशाहिर सचिन ढोबळे,अर्चना चौरे, शिवांजली मुंगसे, सचिन भोसले, किरण पाटील, भाग्यश्री देशमुख, कैलास जाधव यांच्यासह सुमारे ३०० अभ्यासक विद्यार्थींनी व विद्यार्थी उपस्थित होते

 
 
या स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अभ्यास करून एम. पी. एस. सी. परिक्षेत पास होवून मंत्रालय सहाय्यक पदावर नुकतेच नियुक्त झालेले उद्धव विभुते व अश्विनी जगताप यांचा तसेच व्याख्याते संतोष जोगदंड व सचिन ढोबळे यांचाही सत्कार यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्तेकरण्यात आला
 
 

स्वच्छ भारत मिशन (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी)

   

सफाई कर्मचा-यांच्या कामावर शहरवासियांचे आरोग्य अवलंबून असते. सफाई कर्मचा-यांच्या योगदानामुळे शहर स्वच्छ, सुंदर राहण्यास मोलाची मदत होते असे मत आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले.
स्वच्छ भारत मिशन (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य कर्मचा-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षमताबांधणी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन संकलन व वर्गीकरण याबाबतच्या आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते.
मोहननगर चिंचवड येथील राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यशाळेस नगरसदस्या सुजाता टेकवडे, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते, क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.आर.आर.भोसले, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, जनवाणीचे कार्यक्रम अधिकारी बापूराव पवार, जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे, बाळासाहेब मरळ, मुख्य आरोग्य निरीक्षक प्रभाकर तावरे, एस. एस. कुलकर्णी, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे, तानाजी दाते, के.डी.दरवडे, डी.जे.शिर्के यांच्यासह आरोग्य विभागाचे सुमारे ७०० कर्मचारी उपस्थित होते

 
 
या कार्यशाळेमध्ये कचरा संकलन व वर्गीकरण करण्याबाबतची माहिती जनवाणीचे अधिकारी बापू पवार यांनी दिली तर व्यसनमुक्ती या विषयावर जीवन विद्यामिशनचे संतोष तोत्रे यांनी मार्गदर्शन केले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे यांनीही यावेळी कर्मचा-यांनी शिस्तीचे पालन करणेबाबत तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर डॉ. आर.आर.भोसले यांनी कर्मचा-यांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी या विषयावरही मार्गदर्शन केले. अर्णव कुंभार या शालेय विद्यार्थ्यांने स्वच्छता कर्मचा-यांचे आरोग्याबाबत त्याने केलेल्या निरीक्षणाची माहिती देवून काही सोप्या सवयी अंगिकारल्यास आजारापासून बचाव करता येईल असे दिसून आल्याचे सांगितले
 
 

पवनाथडी जत्रा

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित पवनाथडी जत्रेचे उद्घाटन शुक्रवार दि.१२ फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी ३.३० वा. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.
पिंपरी येथील एच.ए.मैदान, येथे शुक्रवार दि.१२ फेब्रुवारी २०१६ ते सोमवार दि.१५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सकाळी १० वा. ते रात्री १० वाजेपर्यंत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पवनाथडी जत्रेत विविध बचतगटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले
 
 
पवनाथडी जत्रेनिमित्त आयोजित विविध बचतगटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी तसेच सादर करण्यात येणा-या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासही उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.
 
 

महापौर चषक राज्यस्तर फुटबॉल स्पर्धा

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व स्वर्गीय राजेश बहल स्पोर्टस ॲड सोशल फाऊंडेशन, संत तुकारामनगर व नेहरु युवा केंद्र, भारत सरकार पुणे यांच्या सहकार्याने आयोजित महापौर चषक राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले.
रविवारी रात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, संत तुकारामनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, माजी महापौर योगेश बहल, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, क प्रभाग समिती अध्यक्ष किरण मोटे, नगरसदस्य उल्हास शेट्टी, कैलास थोपटे, जितेंद्र ननावरे, नगरसदस्या सुजाता पालांडे, माजी नगरसेवक महमंदभाई पानसरे, बबन गाढवे, माजी शिक्षणमंडळ सभापती अर्जून ठाकरे, मायला खत्री, फजल शेख पुणे कॅन्टोमेन्ट चे सदस्य दिलिप गिरमकर, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय फुंदे, फुटबॉल असोशिएशनचे सरचिटणीस किरण परदेशी, सुनिल पालांडे, अण्णा सुर्यवंशी, किरण सुवर्णा, संभाजी पारटे, रज्जाक पानसरे, विठ्ठल बेंडे आदी उपस्थित होते
 
 

 

 
 

सन २०१६-१७ साठीचे अंदाजपत्रक

   
कोणतेही करवाढ नसलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन २०१६-१७ साठीचे सुमारे २ हजार ७०७ कोटी रुपयांचे व २७७ कोटी शिल्लकेचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव य़ांनी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्याकडे सादर केले.
आज सकाळी स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते.
या अंदाजपत्रकात महसुली खर्चासाठी १२९९ कोटी रुपयांची तर भांडवली खर्चासाठी ११९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. स्थानिक संस्था करातून १ हजार ३५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर करसंकलनातून ४५० कोटी व बांधकाम परवानगी विभागाकडून ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज करण्यात आला आहे. पाणीपट्टी व इतर बाबींकडून ६० कोटी, गुंतवणूकीवरील व्याज १०० कोटी रुपये तर भांडवलीजमा १०५ कोटी रुपये धरण्यात आली आहे.

 
 
महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी २४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यावेळी स्थायी समिती सदस्य डब्बू आसवाणी, कैलास थोपटे, विनायक गायकवाड, प्रसाद शेट्टी, धनंजय आल्हाट, सविता साळुंखे, रमा ओव्हाळ, अनिता तापकीर, विमल काळे, सुनिता गवळी, संध्या गायकवाड, मुख्यलेखापाल प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.
 
 

केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अंतर्गत पुरस्कार

   
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेसाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा तर देशातील ९ व्या क्रमांकाचा स्वच्छ शहरासाठीचा पुरस्कार केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी आज स्विकारला.
नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेत्या मंगला कदम व माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण हेही यावेळी उपस्थित होते
 
  स्वच्छ भारत अभियानांतर्गत १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी दि. ५, ६ व ७ जानेवारी २०१६ दरम्यान केंद्र शासनाच्या पथकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. संपूर्ण देशातून ७५ शहरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एकूण २००० गुणांपैकी १५५९ गुण मिळवून देशातून ९ व्या तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पारिताषिक मिळविले आहे. शहरातील स्वच्छता व स्वच्छता विषयक राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल आज केंद्र शासनाच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला  
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in