पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-डिसेंबर २०१५
 

राष्ट्रसंत गाडगे महाराज स्मृतीदिन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सकाळी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर शकुंतला धराडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, नंदकुमार वाघ, विलास साळवी, उद्यान विभागाचे जोपा पवार, संजय शिंदे, विद्युत विभागाचे रामदास कटके, विष्णु गवारी, शशिकांत शिंदे, काळुराम नलावडे, प्रफुल्ल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
यावेळी संपादक गजानन गवळी यांचे चंद्रकिरण दिवाळी विशेषांक २०१५ अंतर्गत थोर युगपुरुष संत गाडगेबाबा या विशेषांकाचे प्रकाशन महापौर शकुंतला धराडे व सहाय्यक आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 

सदनिकांची संगणकीकृत सोडत

   

घरकुल लाभार्थ्यींना आपले स्वतःचे घर व हक्काचा निवारा आज मिळाला असून याचा आनंद तुम्हा सर्वांबरोबर मलाही होत असल्याचे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटाकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील २ सोसायटयांच्या इमारती मधील एकूण ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 
 
चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते, गजानन येळमळे, सोसायटीचे चेअरमन सुरेश जाधव, दिपक मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी महापौर शकुंतला धराडे, प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे व नगरसदस्या अश्विनी चिंचवडे यांचे स्वागत करुन कार्यक्रमास सुरुवात केली.
 
 

अखिल भारतीय ग्राहक दिन

   

प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.
सांगवी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये झालेल्या अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. व्याख्याते सरदेसाई यांचा सन्मान सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे व प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, ग्रंथपाल कल्पना जाधव व बहुसंख्येने स्पर्धा परिक्षा ‍विद्यार्थी व नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्वाचे असुन दररोजच्या जीवनक्रमामध्ये प्रत्येक ग्राहकाच्या होणा-या फसवणुकीबाबत प्रत्येकाने याविरोधात जाब विचारला पाहिजे. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे, याबाबतची माहिती समजुन घेणे गरजेचे आहे. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जल प्रवास, विद्युत सेवा, सर्व राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांचाकडून नागरिकांना देण्यात येणा-या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता असल्याचे मतही व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असुन यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसुन येते.
 
 

निवृत्ती वेतनधारक दिन

   
सेवानिवृत्तांनी आपल्या सेवेतील अनुभवाचे आत्मचिंतन पुस्तकरूपी ठेव्याच्या माध्यमातुन पुढच्या पिढीला द्यावे. सुखी जीवनाचा मंत्र आपणच शोधावा असे मत आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित निवृत्ती वेतनधारक दिनानिमित्त (पेंशनर्स डे) आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
 
 
यावेळी साहित्यिक प्रा. श्याम भुरके यांचे “सुखी जीवनाचा मंत्र” या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले ‘डायनिंग टेबल हे हासरे विद्यापीठ असावे. प्रत्येकाने सतत संवाद साधत रहावे. सॉरी या एका शब्दाने अनेक नाती टिकवता येतात. ज्याला एक पाऊल मागे जायचं समजलं त्याला जीवनात आनंदी, यशस्वी व सुखी राहण्याचा मंत्र कळतो’. ‘सध्या भारतात सुखी समाधानी राहणारी एकच जमात आहे आणि ती म्हणजे निवृत्त वेतनधारक’ असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले. आपल्य जीवनात आनंदी जगण्यासाठी पंचसुत्रीचा व तीन रेघांचा वापर करावा असेही ते म्हणाले.
 
 

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मोहीम

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेबाबत नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून काही स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या विविध गटांमार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली
 
 

 

 
 

महापौर चषक राज्यस्तरीय Soft ball स्पर्धा

   
 
 
 
     
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in