पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-ऑगस्ट २०१७
 

स्वातंत्रदिन ध्वजावंदन

   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर नितीन काळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, नगरसदस्या सुलक्षणा धर, मीनल यादव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रविण अष्टीकर, आशादेवी दुरगुडे, योगेश कडूसकर, विजय खोराटे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय,‍ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, सह शहर अभियंता प्रविण तुपे, रविंद्र दुधेकर, अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, रामदास तांबे, प्रविण घोडे, श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, मकंरद निकम, प्रशांत पाटील, प्रविण लडकत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, बजरंग आवारी, रेखा गाडेकर, आशा राउत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विलास वाबळे, अग्नीशमन अधिकारी किरण गावडे, माजी सह आयुक्त अमृतराव सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते

 
 
 
 

स्वातंत्रदिन नागरिकांना मा.महापौरांचा संदेश

   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर नितीन काळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 

 

 
 
 
 

अद्यावत संकेतस्थळाचे अनावरण

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अद्यावत संकेतस्थळाचे (www.pcmcindia.gov.in) अनावरण आज महापौर नितीन काळजे यांचे हस्ते झाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे www.pcmcindia.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असून त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्याने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक बदल करणेत आलेले आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळास प्रतिमहीना सरासरी दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात. संकेतस्थळ ठराविक कालावधीनंतर विविध सुविधांयुक्त नाविन्यपुर्ण स्वरूपात नागरिकांपुढे आणण्याचा महानगरपालिकेचा सतत प्रयत्न असतो. त्यास अनुसरून महानगरपालिकेने नवीन स्वरूपातील संकेतस्थळ विकसित केलेले आहे. नवीन संकेतस्थळामध्ये आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणेत आलेला आहे. जेणेकरुन अधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नव्याने विकसित झालेली संगणक यंत्रणा, टॅबलेट व मोबाईल फोन इत्यादीसाठी वापरणेत येणारे वेब ब्राउजरसाठी सदरचे संकेतस्थळ पूर्णत: सुसंगत असणार आहे.

शहरातील नागरिक महानगरपालिकेकडे विविध समस्यांसाठी विविध माध्यमांद्वारे तक्रारी दाखल करतात. संबंधित विभागाकडून तक्रारीचे निराकरण झाल्यावर ऑनलाईन तक्रार क्लोज केली जाते. मात्र ज्या तक्रारींच्या कार्यवाहीबाबत नागरिकांचे समाधान झालेले नाही अशी तक्रार नागरिकांना स्वत:चे लॉगीनद्वारे ऑनलाईन रि-ओपन करता येणार आहे. तसेच क्लोज केलेल्या तक्रारीबाबत स्वत:चा अभिप्राय (Feedback) नोंदविता येणार आहे

 
 
नवीन संकेतस्थळामध्ये करणेत आलेल्या बदलामुळे टॅबलेट व मोबाईलधारक यांना संकेतस्थळ वापरण्यास सुसह्य होणार आहे. त्याकरीता संकेतस्थळ Responsive Pages च्या स्वरूपात सादर करणेत आलेले आहे.
 
 

अण्णाभाऊ साठे जयंती

   

दीड दिवस शाळेत जाऊन समाजाला प्रेरणा देणारे महान कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांच्या विचारांची व कार्य कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भक्ती-शक्ती चौक , निगडी येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते

महापौर नितीन काळजे म्हणाले, समाजातील तळागाळातल्या वर्गाला बरोबर घेऊन चालणारे अण्णाभाऊ होते. समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजातील इतर घटकांना सुशिक्षित केले पाहिजे. या जयंती  महोत्सवाच्या निमित्ताने कलाकारांना प्रोत्साहन देणा-या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा तसेच आयोजित सांस्कृतिक कार्यकमांचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले

 
 
 
 

गणेशोत्सव शांतता बैठक

   

गणेश मंडळांसाठी मंडप परवाना शुल्क कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यावर्षीपासून महापलिकेच्या वतीने गणेश फेस्टिवल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे शहर आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर,पिंपरी येथे आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते.

महापौर नितीन काळजे म्हणाले, देण्यात येणाऱ्या परवाना पद्धतीमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिक देतील ती ऐच्छीक वर्गणी स्वीकारावी. गणेश उत्सव काळात प्रदूषित वातावरण होणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. असे यावेळी त्यांनी सांगितले

 
 
महापालिका आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पुढे यावे. परवाण्यासाठी एक खिडकी योजना सूरू करण्यात येणार आहे. तसेच शुल्क कमी करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. शाडू मातीच्या मूर्तीचा वापर या गणेशोत्सवात करावा. गणेश मूर्तीचा आकार कमी करून भक्तीचा आकार वाढवावा. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
 
 

Know Your Army

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. यांच्या सहकार्याने एच.ए. मैदान, पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या  "Know Your Army " या प्रदर्शनास गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे ६५ हजार शहरवासीयांनी भेट दिली आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन शहरात प्रथमच भरविण्यात आले असल्याने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रदर्शनाचा कालावधी आणखी एक दिवस वाढविल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. हे प्रदर्शन रविवार दि. १३/०८/२०१७ रोजी स.१० ते सायं ५  दरम्यान नागरिकांसाठी खुले राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे

 
 
 
 

विशेष स्वच्छता मोहिम

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबविणेचे निर्देश मा. महापौर नितीन काळजे व मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट व २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापुर्वी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार, दि. २० ऑगस्ट २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर येथे माहिती व तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे य़ांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 
 
 
 

शांतता बैठक

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या टाऊन पंचायत नगमंगला, मंड्या जिल्हा, कर्नाटक राज्य येथील नगरसदस्य व अधिकारी यांचे स्वागत सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

सह आयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पाबाबतचा माहिती पट अभ्यास दौरा पथकास दाखवण्यात आला. तसेच चित्रफिती द्वारे घरपट्टी व पाणी पट्टी आकारणी बाबतची सविस्तर माहिती ही यावेळी सह आयुक्त दिलीप गावडे यांनी अभ्यास दौरा पथकास दिली.

या अभ्यास दौ-यामाध्ये स्थायी समिती सभापती रागव्हेंद्र, सभापती विजय  कुमार, उपसभापती एन.जे. चंद्रा, नगरसदस्य एन.के.जयकुमार, मंजम्मा, डी.गीथा, बी.आर. भासकर, एन. राजेश्वरी, एन.टी. राजा, भाग्या, शिला, महालक्ष्मी, एन.के.गिरिष, परविण ताज, नुर अहमद, अनवर पशा, स्विकृत सदस्य प्रविण कुमार, रमेश, जाफर शरिफ आदींचा समावेश होता.

 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in