पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-ऑगस्ट २०१६
 

स्वातंत्रदिन ध्वजावंदन

   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर शकुंतला धराडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त दिनेश वाघमारे, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी महापौर योगेश बहल, कविचंद भाट, अपर्णा डोके, नगरसदस्य गोरक्ष लोखंडे, बाबा धुमाळ, नगरसदस्या शमिम पठाण, सुजाता पालांडे, मंदाकिनी ठाकरे, आशा सूर्यवंशी, नंदा ताकवणे, भारती फरांदे, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, अर्जुन ठाकरे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय,‍ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, सहाय्यक आयुक्त यशवंत माने, सुभाष माछरे, आशादेवी दुरगुडे, महेश डोईफोडे, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर, संजय कुलकर्णी, संजय कांबळे, रामदास तांबे, प्रविण घोडे, श्रीकांत सवने, मुख्य लेखापाल प्रमोद भोसले, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, संगणक अधिकारी निळकंठ पोमण, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.

 
 
 
 

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

   

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी अनुभवातून समृद्ध शिक्षण घेतले. त्यांनी अर्धवट शिक्षण घेऊन देखील इतर सुशिक्षित साहित्यिकांच्या तोडीसतोड साहित्य निर्माण केले. ते कृतिशील समाजाकसुधारक होते. असे मत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १३ मधील सेक्टर क्र.२२ येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 
यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करताना एका बाजूला भक्तीशक्ती शिल्प व दुस-या बाजूला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारल्यामुळे शहरात येणा-यांना होण्याची संधी मिळणार आहे. अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केले. त्यांचे मुळ नाव तुकाराम होते. तुकोबांच्या अंगी असलेला विद्रोह अण्णाभाऊंनी स्वीकारला व आपल्या साहित्यातून मांडला. अण्णाभाऊंसह अनेक महापुरुषांना काही लोक विशिष्ठ समाजापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो तसा होऊ नये, असेही  ते  म्हणाले
 
 

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, माजी महापौर संजोग वाघेरे, आर.एस.कुमार, नगरसदस्य तानाजी खाडे, नगरसदस्या भारती फरांदे, सुमन नेटके, शुभांगी बो-हाडे, माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे, माजी नगरसदस्य शशीकिरण गवळी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, रेखा गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे आदि मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
 

स्वच्छ सर्वेक्षण २०१७

   
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१७ “kick off” कार्यशाळेचे थेट दिल्लीवरुन प्रक्षेपण दि. ६/०८/२०१६ रोजी पिंपरी चिंचवड स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यशाळेस मा. महापौर सौ. शकुंतला धराडे क प्रभाग अध्यक्षा श्रीम. शैलेजा शितोळे, ब प्रभाग अध्यक्षा श्रीम. आशा सूर्यवंशी, नगरसदस्या श्रीम. छाया साबळे, श्रीम.भारती फरांदे, श्रीम.सुमन नेटके, सहा. आयुक्त मिनिनाथ दंडवते, ई गव्हर्नर्स अधिकारी श्री. निळकंठ पोमण, श्री.चंद्रकांत खोसे, श्री. चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी श्री. आण्णा बोदडे तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहा.आरोग्याधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छतेबाबतची मानसिकता नागरिकांनी बदलली पाहिजे. स्वच्छतेबाबत प्रसारमाध्यमांनीही जनजागृती करण्यास सहाय्यता करावी असे ते म्हणाले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेनिर्मित स्वच्छतेबाबत चित्रफित उपस्थीतांना दाखविण्यात आली. तसेच यावेळी ई गव्हर्नर्स अधिकारी श्री.निळकंठ पोमण व आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. मिनिनाथ दंडवते यांनी उपस्थीतांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
 
 

छत्तीसगढच्या अधिकाऱ्यांचा दौरा

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध प्रकल्प व योजना ह्या मार्गदर्शक असुन त्याचा अवलंब रायपूर शहरासह छत्तीसगढ राज्यामध्ये करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत छत्तीसगढच्या राज्य शहरी विकास अभिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अभिनव अग्रवाल यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची तसेच महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथिल राज्य शहरी विकास अभिकरणाच्या अधिका-यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते..
महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, सुधीर बोराडे आदि उपस्थित होते.


 
 
यावेळी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती असलेला माहितीपट दाखविण्यात आला तसेच सारथी व मिळकत कराबाबतची माहिती चित्रफितीद्वारे प्रशासन अधिकारी  अण्णा बोदडे व  सुधीर बोराडे यांनी शिष्टमंडळास दिली.
 
 

विविध कामांची पाहणी

   

नागरिकांसाठी पाणीपुरवठा महत्वाचा असल्याने पिंपरी येथील अनुसयाबाई प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पाण्याची टाकी उभारण्यासाठी तांञिक बाब विचारात घेऊन नगररचना व शिक्षण मंडळ अधिकारी व कर्मचारी यांची एकञित बैठक आयोजित करावी. अशा सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अधिका-यांना दिल्या. पिंपरीगाव येथे विविध कामांची पाहणी आज त्यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.

दौ-या अंतर्गत आयुक्त यांनी जयहिंद हायस्कूलला देखील भेट दिली यावेळी प्राचार्य ज्योतिका मलकाणी व उपप्राचार्य कैलास सोनवणे यांनी पवना नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थी काम करणार आहेत. गणपती उत्सवात थर्माकॉल विरहित पिंपरी असा आमच्या हायस्कूलने निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
यावेळी नगरसदस्या उषा वाघेरे, माजी महापौर संजोग वाघेरे, अ प्रभाग अध्यक्ष निलेश पांढरकर, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत खोसे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रमोद ओंबासे, देवन्ना गट्टूवार, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, उपअभियंता विनय ओव्हाळ, रविंद्र पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 

माहिती व तंत्रज्ञान दिवस

   

आधुनिक तंत्रज्ञान व संगणकाचा वापर करुन   कार्यालयात पेपरलेस काम व्हायला पाहिजे, कार्यालयातील फाईल्सची संख्या कमीतकमी झाल्या पाहिजेत असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार, दि. २० ऑगस्ट २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर येथे माहिती व तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शकुंतला धराडे य़ांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 
 
यावेळी महापौर शकुंतला धराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. सुत्रसंचालन आयटी विभागाचे सुधीर बोराडे यांनी केले. तर आभार माहिती व जनसंपर्क विभागाच रमेश भोसले यांनी मानले.
 
 

शांतता बैठक

   

पिंपरी चिंचवड शहरातील गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे आनंदाने व सामंजस्याने साजरा करावा. गणेश मंडळांना पोलीसांनी यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

गणेश मंडळांना महानगरपालिका व पोलीस खात्याबरोबरच विविध खात्यांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये परवानगीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित असेल. पोलीसांचे सहकार्य गणेश मंडळांना राहील. पोलीस कर्मचारी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्यांनी गणेश उत्सव साजरा करावा

.
 
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते.
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in