पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-ऑगस्ट २०१५
 

स्वातंत्रदिन ध्वजावंदन

   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर शकुंतला धराडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, शिक्षणमंडळ सभापती धनंजय भालेकर, माजी महापौर योगेश बहल, कविचंद भाट, अपर्णा डोके, नगरसदस्य गोरक्ष लोखंडे, बाबा धुमाळ, नगरसदस्या शमिम पठाण, सुजाता पालांडे, मंदाकिनी ठाकरे, आशा सूर्यवंशी, नंदा ताकवणे, भारती फरांदे, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, अर्जुन ठाकरे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता महावीर कांबळे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय,‍ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, सहाय्यक आयुक्त यशवंत माने, प्रशांत खांडकेकर, भानुदास गायकवाड, सुभाष माछरे, दत्तात्रय फुंदे, आशादेवी दुरगुडे, महेश डोईफोडे, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर, संजय कुलकर्णी, संजय कांबळे, रामदास तांबे, प्रविण घोडे, श्रीकांत सवने, मुख्य लेखापाल प्रमोद भोसले, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, संगणक अधिकारी निळकंठ पोमण, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.

 
 
 
 

स्वातंत्रदिनाचा संदेश

   

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर शकुंतला धराडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

या प्रसंगी मा. महापौर यांनी शहरातील नागरिक व उपस्थित कर्मचारी यांना शुभेच्छ्या दिल्या

 

 
 
 
 

प्रभाग समिती नामनिर्देशित सदस्य प्रशिक्षण शिबिर

   
मिळालेल्या संधीचा सद्उपयोग करुन प्रभागातील स्विकृत सदस्यांनी जनतेची सेवा करावी असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती नामनिर्देशित सदस्यांकरीता ऑटोक्लस्टर चिंचवड येथे दि. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज सकाळी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त राजीव जाधव, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, ड प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, इ प्रभाग अध्यक्षा विनया तापकीर, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बो-हाडे, नगरसदस्या शैलजा शितोळे, नगरसदस्य निलेश पांढारकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त सुनिल केसरी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यकारी संचालक एस.जी.चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते
 
 
 
 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती

   
सध्या समाज प्रबोधनासाठी समतावादी कविसंमेलनांची आवश्यकता असून महापालिकेने थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथींचे औचित्य साधून अशा समतावादी कविसंमेलनाचे शहरात सातत्याने विविध ठिकाणी आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी राज आहेरराव यांनी केले.
भक्ती शक्ती, निगडी येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा परीसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या समतावादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
आयोजित समतावादी कविसंमेलन सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या टाळयांनी बहरून गेले होते. या संमेलनामध्ये प्रबुध्द परिवर्तनवादी आणि समाजप्रबोधनात्मक कवितांचा समावेश ही या काव्यसंमेलनाची वैशिष्टये होती.

 
 
 
 

आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना सोडत

   
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या घटकांना त्यांच्या हक्काचे घर मिळत आहे, याचा मला मनापासून आनंद असून नागरिकांनी त्याची निगा राखावी असे मत महापौर शंकुतला धराडे यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील ९ सोसायटयांच्या इमारती मधील एकूण ३७८ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज महापौर शंकुतला धराडे यांच्या हस्ते काढण्यात आली.
संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विधी समिती सभापती सुजाता पालांडे, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता राजन पाटील, सक्षम प्राधिकारी मिनीनाथ दंडवते, कार्यकारी अभियंता दिलिप सोनवणे, ईडब्ल्युएस प्रकल्प सल्लागार जी.एम. फडके, प्रशासन अधिकारी सुरेश तुमराम तसेच गजानंद ऐळमळे, रोहिणी डमरे, धनश्री कुलकर्णी, सुजाता कानडे यांच्यासह मोठया संख्येने लाभार्थी उपस्थित होते.


 
 
 
 

बी.आर.टि.एस. सुविधेची पाहणी

   
मा. महापौर व आयुक्त यांनी दि. ५ सप्टें. रोजी सुरु होणारी बि.आर.टि.एस सुविधेची संयुक्तरीत्या पाहणी केली. यावेळी स्थायी समिती अधक्ष्य मा. अतुल शितोळे व महापालिकेचे तसेच पी.एम.पी.एम.एल. चे विविध अधिकारी उपस्थित होते

 
 
 
 

उर्दू माध्यम वर्गाचे उद्घाटन व पुस्तकांचे वाटप

   
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या माध्यमिक विद्यालय खराळवाडी येथे इयता ९ वी उर्दू माध्यम वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मा. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. समवेत नगरसेवक सद्गुरु कदम, नगरसेवक जावेद शेख,नगरसेवक कैलाश कदम व नगरसेविका शमीम पठाण उपस्थित होत्या.

 
 
 
 

शहरातील विविध विषयांवर आढावा बैठक

   
स्वाईन फ्लू व डेंग्यूची साथ लक्षात घेता शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शहर स्वच्छता व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करावा. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी केले. तसेच स्वाईन फ्लू रुग्णांसाठी यशवंतराव चव्हान स्मृती रुग्णालयात स्वतंत्र १२ खाटांच्या अति दक्षता विभागाची (आय.सी.यु.) व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
शहरातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी शुक्रवार दिनांक २१ आगस्ट २०१५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चिंचवड येथील ॲटोक्लस्टर येथे महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.



 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in