पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-एप्रिल २०१७
 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

   

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरंसारख्या थोर महापुरुषांचे विचार प्रत्येकाने जोपासण्याची गरज असल्याचे मत पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोस्तवानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

आंबेडकरी चळवळीचा एक नवा विचार देणारा स्वच्छंद पुणे प्रस्तुत “निळी धम्मपहाट” या गीतगायनाच्या कार्यक्रमामध्ये गायक रवींद्र साठे, अंजली नांदगावकर, रवींद्र शाळू व संजय कांबळे यांनी सुमधुर गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रवींद्र साठे यांनी कबिरा कहे, संघर्षाचा संघर्ष असा भिमरावामुळे व बुद्धमं शरणम गच्छामी हि गीते गायली. अंजली नांदगावकर यांनी माझा भीमाच कुंकू, व भीमा तुजा जन्मामुळे तसेच रवींद्र शाळू यांनी प्रथम नमो गौतमा, ओम,नमो तथा गता नमस्तु गौतमा हि गीते गायली. तर संजय कांबळे यांनी हंसाला लागला बाण, असा थोर योगी झाला हि गीते गायली. डॉ. सत्यजित कोसंबी यांनी बहारदार निवेदन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली

 
 

 

    
 
 

घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

   

घनकचरा व्यवस्थापन ही समस्या गंभीर असून त्यावर प्रक्रिया करणा-या प्रभावी यंत्रणेची आवश्यकता असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
हॉटेल सिट्रस, पिंपरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “घनकचरा व्यवस्थापन” (SWM in Pimpri Chichwad) या विषयाबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, नगरसदस्या आशा शेंडगे, आयुक्त दिनेश वाघमारे, स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँन्ड अँम्बेसिडर अर्जून पुरस्कार विजेत्या खेळाडू अंजली भागवत सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोग्राम मॅनेजर दृष्टा राऊळ, आदी उपस्थित होते

 

 
 
 
 

क्रांतिसुर्य महात्मा फुले जयंती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

     मनमा भवनात झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या आशाताई शेंडगे, सुलक्षणा शीलवंत, माधवी राजापुरे, माजी स्थायी समिती सभापती राजाराम राजापुरे, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, वैद्यकिय संचालक पवन साळवे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत साळवी, शरद जाधव, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, नामदेव शिंत्रे आदी उपस्थित होते

 

 
 

महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, ५० चार चाकी वाहने व २०० दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर ४.२मी. आकराचे ९३ व्यापारी गाळे तसेच प्रत्येक मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.

 
 

विषय समितींच्या सभापती व उपसभापती यांची निवड

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चार विषय समितींच्या सभापती व उपसभापती यांची निवड शनिवार दि. १५ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११ ते दु. २.०० वाजे दरम्यान आयोजित केलेल्या विशेष बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाचे संचालक सुनिल पाटील (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आज सकाळी ११.०० वाजता विधी समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी शारदा सोनवने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. तर उपसभापती पदासाठी अश्विनी जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचीत विधी समिती सभापती व उपसभापती यांचा पिठासीन अधिकारी सुनिल पाटील, महापौर नितिन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, अपक्ष आघाडीचे गट नेते कैलास बारणे तसेच सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नगरसचिव उल्हास जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

 
 
 
 

पालखी सोहळा स्वागत समारंभ आढावा बैठक

   

आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू आणि आळंदी संस्थानांनी जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे शौचालय उभारण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
आज स्थायी समिती सभागृहात झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाचे नियोजनाच्या आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते

 

 

 
 

 

 
 

आयुक्तपदाचा पदभार श्रावण हर्डीकर यांनी स्विकारला

   

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार श्रावण हर्डीकर यांनी आज सकाळी स्विकारला. अतिरीक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेवून कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच विभाग प्रमुखांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नागरिकांना सेवा सुविधा देताना अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. सर्व सुरु प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
श्रावण हर्डीकर हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे शिक्षण बी.ई. (इन्स्ट्र्यूमेंटेशन) झाले असून त्यांनी आयएएस परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर भारतातून सातवा क्रमांक पटकावला आहे

 

 
 
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in