पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-एप्रिल २०१६
 

विकास प्रकल्पांचे भूमिपूजन

   

नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता शहराचा विकास साधता येतो. शहरातील प्रत्येक नागरिकाला केंद्र ‍बिंदू मानून सर्वांनाबरोबर घेऊन शहराचा विकास करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात येणा-या शहरातील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आज सकाळी ९.०० वा. पासून त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी दिघी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. धरणात पाण्याचा साठा कमी झाला असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढेच पाणी वापरुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पावसाळा सुरू होईपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा म्हणून १५ एप्रिलनंतर शहरात  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

 
 

आज सकाळी ९.०० वाजता भूमकर चौक ते शिवाजी चौक (हिंजवडी) या रस्त्याचे भूमिपूजन तर सकाळी ९.३० वाजता भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक (किवळे) ४५ मीटर या रस्त्यावरील निसर्ग दर्शन सोसायटीजवळ रेल्वे लाईनवर उभारण्यात येणा-या उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाले.

    
 
 

दळवीनगर येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन

   

सकाळी १०.३० वाजता दळवीनगर येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन तर सकाळी ११.०० वाजता प्रभाग क्रमांक ६३ मधील नाशिक फाटा येथील उड्डाणपूल येथे पादचा-यांसाठीच्या पूलाचे भूमिपूजनही पार पडले

शहरीकरण व नागरीकरण मोठया प्रमाणावर झाले असल्याकारणाने सध्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांपर्यंत पोहचली आहे. विकास कामे करताना कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. विकास कामे करताना व्यवहारी मार्ग काढावा लागतो. जास्तीत जास्त नागरिकांचे समाधान होईल अशीच कामगिरी लोकप्रतिनिधींनी करावी. सर्व जातीधर्माचे लोक शहरात गुण्यागोविंदाने राहतात. ओला व सुका कचरा वेगळा करुन कच-याची योग्य ती विल्हेवाट लावावी. घनकच-यापासून वीजनिर्मिती करण्यात यावी.

 
 
खेळाची मैदाने, उद्याने, कुस्ती प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात यावी. नागरिकांना चांगली सेवा देण्याबाबत महापालिका कटीबध्द आहे. हॉकर्स झोन, शॉपींग सेंटर, व्यापारी संकुल, विविध शैक्षणिक संस्थांची निर्मितीही या भागात केली जाईल. आपले शहर देशातील सर्व सोयीयुक्त व नियोजनबध्द शहर आपण सर्वजण मिळून बनवूया असेही ते म्हणाले. शहराचा विकास करताना जनतेला त्रास होणार नाही याचा प्रयत्न आहे. आमदार महेश लांडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य चंद्रकांत वाळके यांनी केले. सुत्रसंचालन प्रशासन अधिकारी आण्णा बोदडे यांनी केले. तर आभार नगरसदस्या आशा सुपे यांनी मानले
 
 

भाजी मंडई व व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३५  भोसरी येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन समारंभ गुरूवार दिनांक ०७ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलनाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ४२०० चौ.मी. असून याकामास सुमारे ११ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपये खर्च येणार आहे.
सदरची इमारत आर.सी.सी.फ्रेम स्ट्रक्चर असून त्यामध्ये तळमजला अधिक तीन मजले आहेत. तळमजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी प्रत्येकी २.४ मी.x१.५ मी.चे १८४ गाळे असणार आहेत.

 
 

महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, ५० चार चाकी वाहने व २०० दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर ४.२मी. आकराचे ९३ व्यापारी गाळे तसेच प्रत्येक मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.

 
 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी चौक, एच.ए कॉलनी व दापोडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बु आसवाणी व आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तसेच पिंपरी चौक, एच.ए कॉलनी व दापोडी येथे आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राहुल भोसले, विधी समिती सभापती नंदा ताकवणे, शहर सुधारणा समिती सभापती स्वाती साने, ब प्रभाग अध्यक्षा आशा सुर्यवंशी, क प्रभाग अध्यक्षा शैलेजा शितोळे, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, नगरसदस्य सद्गुरू कदम, अरुण बो-हाडे, नगरसदस्या अमीना पानसरे, रमा ओव्हाळ, माजी उपमहापौर महमंदभाई पानसरे, माजी नगरसेवक सन्नी ओव्हाळ, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता एम.टी.कांबळे,

 
 
सहाय्यक आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, दत्तात्रय फुंदे, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर, संजय कांबळे, संजय भोसले, अनिल सुर्यवंशी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, वसंत साळवी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, रामकिशन लटपटे, उपअभियंता विशाल कांबळे, कार्यालयीन अधिक्षक नारायण मोरे, व्याख्याते किशोर वाघमारे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड, संतोष जोगदंड, गणेश भोसले, बापु गायकवाड, निवृत्ती आरवडे, चंद्रकांत कांबळे, भिमराव कांबळे, अशोक गायकवाड आदी. मान्यवर उपस्थित होते
 
 

भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचा मानपत्र देऊन भव्य गौरव

   

“गौतम बुध्द यांचा धम्म व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच भारत देशाला प्रगती पथावर नेऊ शकतात”, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते मानपत्र देऊन भव्य गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

 

 
 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पिंपरी या ठिकाणी, महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी, नगरसेवक गोरक्ष लोखंडे, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, चंद्रकांत माने, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर, अनिल सुर्यवंशी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत साळवी, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, ॲड.बी.के.कांबळे, बापू गायकवाड, संतोष जोगदंड, तुकाराम गायकवाड, प्रविण कांबळे, चंद्रकांत कांबळे, शहर अभियंता एम.टी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

 
 

विशेष स्वच्छता मोहिम

   

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत दिनांक २४/४/२०१६ रोजी सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत “विशेष स्वच्छता मोहिम” राबविणेत येणार आहे. सदरचे  स्वच्छता मोहिमेसाठी महानगरपालिकेच्या  अ / ब / क / ड / इ / फ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील खालील ठिकाणे निश्चीत करणेत आलेली आहेत.

सदर मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सामाजिक संस्था, मंडळे, महिला बचत गट, जेष्ठ नागरीक संघ, एन.जी.ओ., व सर्व नागरीकांनी उस्फुर्तपणे भाग घेऊन सदरचे अभियान यशस्वीपणे राबविणेस सहकार्य करावे असे आवाहन करणेत येत आहे

 
 
महापौर चषक जिल्हास्तर व्हॉलिबॉल (पासिंग) स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, बारामती, सासवड येथील एकूण १६ संघ सहभागी झाले असून यामध्ये १२ पुरुष संघ व ४ महिला संघ यांचा समावेश आहे
 
 

१० कलमी कार्यक्रम स्पर्धेचे पारितोषिक वितरण

   

कर्मचारी व अधिकारी यांच्या चांगल्या कामामुळे शहर विकास होण्यास मदत होते. अधिकारी व कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर सहा महिन्यांनी स्पर्धा घेण्यात यावी असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा व गतिमानता अभियान अंतर्गत १० कलमी कार्यक्रम स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. चिंचवड येथील ॲटोक्लस्टर येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, नगरसदस्या सुजाता पालांडे, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर, आशादेवी दुरगुडे, भानुदास गायकवाड, डॉ. महेशकुमार डोईफोडे, चंद्रकांत खोसे, सुभाष माछरे, योगेश कडूसकर, चंद्रकांत इंदलकर, विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रविण लडकत, संजय कुलकर्णी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, रेखा गाडेकर आदी उपस्थित होते

 
 
आयुक्त राजीव जाधव म्हणाले, “स्पर्धेत मिळालेल्या पहिल्या व दुस-या नंबरमध्ये सातत्य टिकवले पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असलेल्या सुविधा इतर महापालिकेत नाहीत. महापालिकेच्या विकास योजनाही कौतुकास्पद आहेत. महापालिकेत असलेली धन्वंतरी योजना इतर महापालिकेत दिसून येत नाही. प्रामाणिकपणे काम करणे जरुरीचे आहे. अधिकारी, कर्मचा-यांच्या प्रत्येक कृतीत जोपर्यंत माणुसकीचा ओलावा राहणार नाही तोपर्यंत तुम्ही उत्कृष्ट कर्मचारी होवू शकत नाही असेही ते म्हणाले. शहरावर व समाजावर प्रेम केल्यास जबाबदारीची पातळी वाढते व तुमच्या कामात सुधारणा होते. कर्मचा-यांना बक्षिस देवून त्यांच्याकडून काम करुन घेणे केव्हाही चांगले असते. शासकीय सेवेत जबाबदारीने काम करणे अत्यंत महत्वाचे असते. महापालिकेच्या सर्व योजना कर्मचा-यांच्या यशस्वी कार्यामुळे सफल झाल्या असेही ते म्हणाले.
 
Social Message by pcmc
 

पाण्याचे योग्य नियोजन व बचत करा

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in