पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  ई-वार्तापत्र : माहे-जून २०१५
 

रुग्णालयाचे उदघाटन

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तानाजीनगर, चिंचवड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन व त्याचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, असे नामकरण तसेच बाह्यरुग्ण विभागाचे माता रमाई आंबेडकर बाहय रुग्ण विभाग असे नामकरण व उद्घाटन करण्यात आले. तानाजीनगर चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी सुमारे ५ कोटी खर्च झाला आहे. या रुग्णालयामध्ये ४१ खाटांची सोय करण्यात आली असून तळमजल्यावर तातडीक वैद्यकिय कक्ष, केसपेपर विभाग, प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग आणि औषधवाटप विभाग असणार आहे. पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण संकुलामध्ये जनरल

 
  मेडिसिन, फिजिशियन, बालरोग व अस्थिरोग ओपीडी असणार आहे. तसेच क्षयरोग विभाग, फिजीओथेरपी विभाग, १२ खाटांचा बालरोग वॉर्ड आहे. दुस-या मजल्यावर प्रत्येकी १२ खाटांच्या क्षमतेचे पुरुष मेडिकल व महिला मेडिकल वॉर्ड असणार आहेत. तसेच ५ बेड्ची क्षमता असणारा मेडिसिन अतिदक्षता विभागही दुस-या मजल्यावर लवकरच कार्यरत होणार आहे. अशा रितीने तालेरा रुग्णालयाच्या ७० खाटांमध्ये नवीन इमारतीच्या ४१ खाटांची भर पडणार असून एकूण खाटांची क्षमता १११ होणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर येणारा ताण कमी करण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होणार आहे.

 
 

कुदळवाडी – जाधववाडी येथे शाळेच्या इमारतीचे भुमिपूजन

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावातील सुविधांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक ५ कुदळवाडी – जाधववाडी येथे शाळेच्या इमारतीचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार महेश लांडगे होते. आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती साधना जाधव, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बो-हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, नगरसदस्य राहुल जाधव, नगरसदस्या पौर्णिमा सोनवणे, स्वाती साने, दत्तात्रय

 
  साने,अजय सायकर, नितीन काळजे, रामदास जाधव, संजय नेवाळे, सुभाष मोरे, बबन मोरे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, राजेंद्र राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 

साई चौक, पिंपरी या सब-वे चे उद्घाटन

    पिंपरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या एच.ए.कंपनी ते साई चौक, पिंपरी या सब-वे चे उद्घाटन यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीचे उद्घाटन शनिवार दि. २० जून २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजतामहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

 
       
 

मा .महापौर यांचे मुख्यमंत्री महोदयांना पत्र

    मा . महापौर यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांनबाबत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन दिले, सदर पत्रात शहरातील बांधकामे नियमित होणे, नदी प्रकल्प राबविणे, सुरु असलेल्या विविध विकासकामांना शासनाकडून निधि मिळावा व स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा समावेश व्हावा आसे नमूद केले आहे

 
       
 

क क्षेत्रिय कार्यालाया मार्फत स्वच्छता मोहिम

    क क्षेत्रिय कार्यालाया मार्फत दि. १/६/२०१५ रोजी स्वच्छता मोहिम आयोजीत केली होती. जुनी सांगवी (१)ममता नगर (२)ST कॉलनी (३)PWD मैदान (४)मिल्ट्री हद्द या भागामध्ये स ७.०० ते ९.०० या वेळे मध्ये खाजगी व म.न.पा चे प्लॉट साफ करून घेण्यात आले. सदरच्या मोहीमे मध्ये मा. आयुक्त श्री. राजीव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शना खाली क क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी श्री.डी.एम.फुंदे, कार्यकारी अभियंता श्री मकरंद निकम, लेखाधिकारी श्री. वसंत उगले, प्रशासन अधिकारी श्री. रामकिसन लटपटे, कार्यालयीन अधिक्षक नाना मोरे, सहा. आरोग्याधिकारी श्री. एम.एम.शिंदे व श्री. आर.एम.भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम.बेद, श्री. शेख विद्युत विभाग, पर्यावरण

 
  संवर्धन समिती सभासद, सांगली जिल्हा मित्र मंडळ (पिं.चि) सर्व आरोग्य निरीक्षक क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य मुकादम, प्रभागातील स्थापत्य, पाणीपूरवठा, विद्युत, अतिक्रमण, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
 

विविध स्वयंसेवी संस्था व नागरिक यांचा सत्कार

    नागरिकांनी पर्यावरणाची काळजी घेतली तर शहर कचरा मुक्त होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहिल व डासांपासून निर्माण होणा-या आजाराचा अटकाव होईल, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्था व नागरिक यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करणेत आला.

 
       
 

महानगरपालिकेचे ई-गव्हर्नन्स प्रकल्पास अलाहाबाद महानगरपालिकेची भेट

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ई-गव्हर्नन्स प्रकल्पासह विविध विकास प्रकल्प, आमच्यासाठी पथदर्शक असल्याचे मत अलाहाबाद महानगरपालिकेच्या महापौर अभिलाषा गुप्ता व आयुक्त डी.के.पांडे यांनी व्यक्त केले.अलाहाबाद महानगरपालिकेच्या पथकाने आज महापालिकेस भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, पक्षनेत्या मंगलाताई कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती साधना जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ई-गव्हर्नन्स अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, प्रशासन

 
  अधिकारी अण्णा बोदडे, संदिप खोत, सोहन निकम, सिस्टिम ॲनॅलिस्ट श्रीधर पवार, मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Social Message by pcmc
 

Save Water

     
contact
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mumbai-Pune Road, Pimpri, Pune-411018
Maharashtra, INDIA
Phone: 91-020-27425511/12/13/14
67333333 / for direct contact please dial 6733 and extension no.
Fax: 91-020-27425600 / 67330000                    Email: pcmc@vsnl.com / egov@pcmcindia.gov.in